बॉडी बिल्डर संकल्प भाटकरकडून आई वडिलांवर जीवघेणा हल्ला: आईचा मृत्यू, वडील चिंताजनक

194
बॉडी बिल्डर संकल्प भाटकरकडून आई वडिलांवर जीवघेणा हल्ला: आईचा मृत्यू, वडील चिंताजनक
बॉडी बिल्डर संकल्प भाटकरकडून आई वडिलांवर जीवघेणा हल्ला: आईचा मृत्यू, वडील चिंताजनक

बॉडी बिल्डर संकल्प भाटकर याने आई वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोड येथे घडली. या जीवघेण्या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीररीत्या जखमी झाले आहे. वडिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कासारवडवली पोलिसांनी आई-वडिलांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संकल्प भाटकर याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनिता विलास भाटकर (६६) आणि विलास मुकुंद भाटकर (७१) असे हल्ला करण्यात आलेल्या आई-वडिलांचे नाव आहे. विनिता यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संकल्प हा ठाणे पूर्व कोपरी या ठिकाणी राहण्यास असून आई वडील मोठ्या भावासह ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कोरल हाईट्स येथे राहत होता. दोन आठवड्यापूर्वी संकल्प याचा आई वडिलांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. गुरुवारी सकाळी ११ वाजता संकल्प हा भावाच्या घरी गेला व त्या ठिकाणी त्याने आई आणि वडिलांसोबत जुन्या पुन्हा वाद घातला. या वादातून त्याने आणलेल्या चाकूने आई वडिलांवर वार करून जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या विनिता आणि विलास यांना शेजाऱ्यांनी जवळच्या खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी विनिता यांना तपासून मृत घोषित केले आणि विलास यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या संकल्प भाटकर यांचा कासारवडवली पोलिसांनी शोध सुरू केला.

(हेही वाचा – बनावट नोटांच्या प्रकरणात मुंबईत सहा ठिकाणी NIAची धाड; प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हात)

दरम्यान संकल्प हा मोटारसायकवरून मुंबईच्या दिशेने पळून जात असताना कुर्ला नेहरू नगर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी संकल्प याच्या विरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संकल्प हा बॉडी बिल्डर असून त्याने अनेक शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकल्या आहे. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संकल्प हा स्टिरॉइड्स घेत असे आणि त्याला पटकन राग येऊन रागाच्या भरात तो हिंसक कृत्य करीत असे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.