Ghulam Mohammed Sheikh : उत्कृष्ट चित्रकार गुलाम मोहम्मद शेख

शेख यांनी जगभर आपल्या कलेचे प्रदर्शित केलेच, पण याद्वारे त्यांनी आपल्या भारतीय कलेचा प्रचार केला.

399
Ghulam Mohammed Sheikh : उत्कृष्ट चित्रकार गुलाम मोहम्मद शेख
Ghulam Mohammed Sheikh : उत्कृष्ट चित्रकार गुलाम मोहम्मद शेख

गुलाम मोहम्मद शेख (Ghulam Mohammed Sheikh) यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३७ साली गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर येथे झाला. हा भाग आता सौराष्ट्र म्हणून ओळखला जातो. त्यांजी आपले मॅट्रिकचे शिक्षण १९५५ साली पूर्ण केले. त्यानंतर १९५९ साली ललित कला (Fine arts) या विषयामध्ये बी.ए. ची पदवी मिळवली. पुढे मग १९६१ साली बडोदा इथल्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमधून एम.ए. केले. त्यानंतर पुढे १९६६ साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्टस् मधून ARCA ही पदवी मिळवली.

१९६० साली त्यांनी बडोदा येथील फॅकल्टी ऑफ फाइन आर्ट्स, एम.एस. युनिव्हर्सिटी येथे प्रोफेसर म्हणून नोकरी केली. तिथे ते ललित कलांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवायचे. पुढे त्याच युनिव्हर्सिटीमध्ये ते चित्रकलासुद्धा शिकवायला लागले. पुढे त्यांनी १९८७ आणि २००२ साली व्हिजिटिंग आर्टिस्ट म्हणून शिकागो इथल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. गुलाम मोहम्मद शेख (Ghulam Mohammed Sheikh) हे चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून भारतीय कलाक्षेत्रातले महत्त्वाचे व्यक्ती आहेत. शेख यांनी जगभर आपल्या कलेचे प्रदर्शित केलेच, पण याद्वारे त्यांनी आपल्या भारतीय कलेचा प्रचार केला.

गुलाम मोहम्मद शेख (Ghulam Mohammed Sheikh) हे फक्त चित्रकार म्हणून ओळखले जात नव्हते, तर ते एक उत्कृष्ट लेखक आणि शिक्षक म्हणूनही नावाजलेले होते. १९७४ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या कवितेच्या पुस्तकाची समीक्षकांनीही चांगलीच स्तुती केली होती. त्यांनी घेर जतन नावाची एक मालिकाही लिहिली होती तसेच क्षितिज, विश्वमानव आणि सायुज्य नावाच्या मासिकाचे संपादनही केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी अमेरिकन चित्रकलेवर आधारित एका पुस्तकाचा अनुवाद लिहिला होता.

(हेही वाचा-Dineshandini Dalmia : पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला – कवयित्री आणि लेखिका दिनेशनंदिनी दालमिया)

गुलाम मोहम्मद शेख (Ghulam Mohammed Sheikh) यांना देण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:-

◆राष्ट्रीय पुरस्कार, ललित कला अकादमी, नवी दिल्ली, १९६२.
◆भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार, १९८३.
◆कालिदास सन्मान, मध्य प्रदेश सरकार, २००२.
◆भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार, २०१४.
◆गुजराती लेखनसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०२२.

गुलाम मोहम्मद अली शेख यांची प्रदर्शने:-

◆जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई (वैयक्तिक प्रदर्शन), १९६०.
◆ राष्ट्रीय प्रदर्शन, नवी दिल्ली, १९६२
◆ VII टोकियो बिएनाले, टोकियो, जपान, १९६३.
◆सिंक्विम बेईंनाले डे, पॅरिस, १९६७.
◆भारतीय कला पुरस्कार, ललित कला अकादमी, नवी दिल्ली, १९७२.

याव्यतिरिक्त जगभरातील अनेक ठिकाणी गुलाम मोहम्मद शेख (Ghulam Mohammed Sheikh) यांनी प्रदर्शने भरवली आणि त्यामध्ये भागही घेतला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.