Ghanshyamdas Birla : अनेक अडचणींना तोंड देऊन व्यवसायाची जागतिक पातळीवर भरभराट करणारे घनश्यामदास बिर्ला 

Ghanshyamdas Birla : ब्रिटिश आणि स्कॉटिश व्यापाऱ्यांनी घनश्याम दास बिर्ला यांचा व्यापार बंद पडण्याचा खूप प्रयत्न केला. पण अनेक अडचणींना तोंड देऊनही. घनश्याम दास बिर्ला हे खंबीरपणे उभे राहिले.

122
Ghanshyamdas Birla : अनेक अडचणींना तोंड देऊन व्यवसायाची जागतिक पातळीवर भरभराट करणारे घनश्यामदास बिर्ला 
Ghanshyamdas Birla : अनेक अडचणींना तोंड देऊन व्यवसायाची जागतिक पातळीवर भरभराट करणारे घनश्यामदास बिर्ला 
घनश्यामदास बिर्ला हे प्रसिद्ध भारतीय व्यापारी होते. त्यांचा जन्म १० एप्रिल १८९४ साली राजस्थानमधील मारवाडी माहेश्वरी समाजात झुंझुनू जिल्ह्यातील पिलानी या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव राजा बलदेवदास बिर्ला असं होतं. त्यांना चार मुलं होती. त्या चौघांपैकी घनश्याम दास बिर्ला (Ghanshyamdas Birla) हे जास्त यशस्वी झाले.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम
१८८४ साली राजा बलदेवदास बिर्ला हे व्यापाराच्या नव्या संधींच्या शोधात मुंबईत आले. त्याच वर्षी त्यांनी शिवनारायण बलदेवदास ही कंपनी सुरू केली. त्यानंतर १८९७ साली कलकत्ता येथे बलदेवदास जुगल किशोर ही कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपन्या कापूस, धान्य, चांदी आणि इतर अनेक वस्तूंचा व्यवसाय करायला लागल्या.
राजा बलदेवदास बिर्ला गेल्यानंतर, कुटुंबाचा व्यावसायिक वारसा घनश्याम दास बिर्ला यांच्याकडे आला. त्यांनी व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करायला सुरुवात केली.
कापड व्यापारात स्वतःचे स्वतंत्र युनिट सुरू करण्यासाठी ते कलकत्त्याला गेले. कारण जगातलं सर्वात मोठं ताग उत्पादन करणारं ते शहर होतं. तिथे त्यांनी स्वतंत्रपणे ज्यूट ब्रोकर म्हणून काम सुरू केलं आणि १९१८ साली त्यांनी तिथे बिर्ला ज्यूट मिल्सची स्थापना केली.
अनेक अडचणींना तोंड देऊन केला व्यवसाय
त्या काळी ब्रिटिश आणि स्कॉटिश व्यापाऱ्यांनी घनश्याम दास बिर्ला यांचा व्यापार बंद पडण्याचा खूप प्रयत्न केला. पण अनेक अडचणींना तोंड देऊनही. घनश्याम दास बिर्ला हे खंबीरपणे उभे राहिले. पहिले महायुद्ध झाले, ब्रिटिश राजवटीत तुटवडा निर्माण झाला. त्यावेळेस घनश्याम दास बिर्ला यांचा कलकत्ता इथला व्यवसाय गगनाला भिडला होता.
१९१९ साली पाच लाखांची गुंतवणूक लावून बिर्ला ब्रदर्स (Ghanshyamdas Birla) कंपनीची सुरुवात झाली. आजच्या काळात बिर्ला ही भारतातल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते.
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.