G20 Summit : भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणा; काय म्हणाले पंतप्रधान

G20 Summit 2023 : ग्लोबल साऊथच्या देशात आम्ही पायाभूत सुविधेतील अंतर कमी करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो”, असंही मोदी म्हणाले.

23
G20 Summit : भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणा; काय म्हणाले पंतप्रधान
G20 Summit : भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणा; काय म्हणाले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० परिषदेत भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली. (G20 Summit) “आज आपण सर्वांनी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार होताना पाहिला आहे. येणाऱ्या काळात भारत हा पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यात अर्थव्यवस्था इंटिग्रेशनचे प्रभावी माध्यम असेल. हा करार पूर्ण जगात कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत विकासाला नवी दिशा देईल.” या करारात भारत, UAE, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांचा समावेश आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – SC On Elections : सर्वोच्च न्यायालयाला निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार; काय म्हणाले न्यायालय…)

या कॉरिडॉरमुळे जी २० परिषदेतील सहभागी देशांतर्गत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि आर्थिक पायाभूत सुविधा यात अभूतपूर्व गुंतवणूक होत असल्याचे स्पष्ट केले. (G20 Summit)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मजबूत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा मानवाच्या विकासाचा मूळ आधार आहेत. भारताने आपल्या विकासयात्रेत या विषयाला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे. यामुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत आहे. आम्ही ग्लोबल साऊथच्या अनेक देशात विश्वसनीय सहकाऱ्याच्या रुपात उर्जा, रेल्वे, पाणी, टेक्नोलॉजी पार्ट्ससारख्या क्षेत्रात प्रकल्प सुरू केले आहेत. ग्लोबल साऊथच्या देशात आम्ही पायाभूत सुविधेतील अंतर कमी करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. कनेक्टिव्हिटीचा विचार करताना भारत क्षेत्रीय सीमांना मर्यादित ठेवत नाही. सर्वच क्षेत्रात कनेक्टिव्हिटी वाढवणं भारताची मुख्य प्राथमिकता आहे. विविध देशातील फक्त व्यापारी कनेक्टिव्हिटी न ठेवता एकमेकांप्रती विश्वासही वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.” (G20 Summit)

भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरचे स्वागत करताना “सामायिक आकांक्षा आणि स्वप्नांचा प्रवास सुकर करत भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर सहकार्य,नवोन्मेष  आणि सामायिक प्रगतीसाठी दीपस्तंभ ठरेल. जसजसा विद्यमान इतिहास उलगडत जाईल, हा कॉरिडॉर मानवी प्रयत्नांचा आणि महाद्वीपांमधील एकजुटतेचा दाखला बनेल”, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. (G20 Summit)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.