Foxconn in India : फॉक्सकॉन भारतात दुप्पट नोकऱ्या देणार

फॉक्सकॉन तामिळनाडू प्लांटमध्ये 40,000 नोकऱ्या देणार

159
Foxconn in India : फॉक्सकॉन भारतात दुप्पट नोकऱ्या देणार

तैवानची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉनची भारतातील (Foxconn in India) कर्मचारी संख्या आणि गुंतवणूक दुप्पट करण्याची योजना आहे. देशातील कंपनीचे प्रतिनिधी वेई ली यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना त्यांच्या 73 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ही माहिती दिली.

फॉक्सकॉन (Foxconn in India) ही कंपनी तैवानमधील आघाडीची मायक्रोचिप आणि सेमी कन्डक्टर बनवणारी कंपनी आहे. ॲपल कंपनी आपला सर्वाधिक कच्चा माल फॉक्सकॉनकडूनच घेते. थोडक्यात आता ॲपलसाठी लागणारे स्पेअर पार्टही काही प्रमाणात भारतातच तयार होणार आहेत. शिवाय ॲपल फोनची जुळणी भारतात करण्यासाठी कंपनीबरोबर करार सुरूच आहे. ती निर्मितीही तेलंगाणातच होणार आहे.

(हेही वाचा – ITI Trainees Tuition Payments : आयटीआय प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात ४० वर्षांनी वाढ, राज्य शासनाकडून अध्यादेश जारी)

त्यांनी लिंक्डइनवर लिहिले की, ‘तुमच्या नेतृत्वाखाली फॉक्सकॉनची भारतात झपाट्याने वाढ झाली आहे. भारतातील (Foxconn in India) रोजगार, एफडीआय आणि व्यवसायाचा आकार दुप्पट करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षी तुम्हाला वाढदिवसाची मोठी भेट देण्यासाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करू.

कंपनी तामिळनाडू प्लांटमध्ये 40,000 लोकांना नोकऱ्या देते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॉक्सकॉनच्या (Foxconn in India) तामिळनाडू प्लांटमध्ये सध्या 40,000 लोक काम करत आहेत. मागील वर्षी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार वृफॉक्सकॉन पुढील दोन वर्षांत तब्बल 53,000 लोकांना कामावर घेण्याचा विचार करत आहे.

फॉक्सकॉन भारत सरकारच्या PLI योजनेचा भाग आहे

Apple चे तीनही कंत्राटी उत्पादक (Foxconn, Wistron आणि Pegatron) भारत सरकारच्या 41,000 कोटी रुपयांच्या उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजनेचा (PLI) भाग आहेत. या योजनेनंतरच भारतात आयफोनचे उत्पादन वाढले आहे. 2020 मध्ये, भारत सरकारने PLI योजना सुरू केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.