Leopard : विना आमंत्रण बिबट्या पोहोचला पार्टीला; जेवण सोडून तरुणांनी ठोकली धूम

128

श्रावण संपला म्हणून रविवारी गावातील पोट्ट्यांनी पार्टीचा बेत आखला. गावाशेजारील डोंगराच्या कडेला जाऊन त्यांनी पार्टीचे नियोजन केले. पण त्यांच्या पार्टीला अचानक बिबट्याने (Leopard) विना निमंत्रण हजेरी लावल्याने त्यांनी जे धुम ठोकली ते थेट गावात जाऊनच थांबले. या घटनेची वार्ता पसरताच भीतीबरोबरच हास्याने पंचक्रोशीत चर्चा रंगली. वाचा संपूर्ण घटना कुठे अन् कशी घडली.

श्रावणाची अमावस्या झाली. गावातल्या आठ-दहा पोरांचा पार्टीचा बेत ठरला. ठिकाणही ठरले. तीन दगडाच्या चुलीवर मटणही रटरटत होते आणि डोंगरकपारीला झाडाच्या आडोश्यााला दोन डोळे दिपले. ते डोळे होते बिबट्याचे! पार्टील आमंत्रण नसताना देखील बिबट्या आल्याने त्या तरुणांना पळता भुई थोडी झाली. अखेर त्यांनी जीवाची बाजी लावून गाव गाठल. हा प्रसंग घडला सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये.

पार्टीसाठी जागा ठरली, साहित्य आणलं

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर येथील तरूणांनी श्रावणातील सणवारामुळे मांसाहर वर्ज्य केला होता. रोजचे शाकाहारी खाऊन खाऊन कंटाळा आल्याने सामिष पार्टीचे आयोजन करण्याचे ठरले. रविवारी रात्रीच्या पार्टीसाठी जागाही डोंगरकपारीची निवडण्यात आली.

(हेही वाचा Nawaz Sharif : भारत चंद्रावर पोहचला, पण पाकिस्तान कंगाल झाला; काय म्हणाले नवाज शरीफ? )

काही जण उतारा टाकूनच येणार होती

पार्टीसाठी मटण, मसाला, तेल, वाटण, पाणी आणि भांड्याची व्यवस्थाही करण्यात आली. काही पोरं जेवणाच्या तयारीसाठी कडूस पडल्यापासून तळावर जमली होती. तर काही जण गावाचा कारभार आटोपून थोडासा उतारा टाकूनच येणार होती. तीन दगडाची चूल मांडली.

चुलीवर मटण शिजत होते आणि…

चुलीवर मटण रटरटत होतं. चुलीतून अग्निच्या ज्वाला बाहेर येत होत्या. या आगीच्या उजेडात कपारीच्या एका बाजूला असलेल्या झाडाजवळ दोन डोळे चमकले. पाहणार्‍याने मित्राला बघण्यास सांगितले. सर्वांचेच एकमत झाले की, लपून पार्टीला आलेला बिबट्याच (Leopard) हाय बरं का, मग काय? समद्यांचीच पाचावर धारण बसली. चुलीवर शिजणारं मटण रटरटतच होतं. सगळं तिथंच टाकलं. आणि बिबट्याच्या भीतीने गावाकडच्या वाटेने धुम ठोकली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.