Jammu Kashmir: कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून ५ दहशतवादी ठार

107
Jammu Kashmir: कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून ५ दहशतवादी ठार
Jammu Kashmir: कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून ५ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये शुक्रवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी ५ पाकिस्तानी दहशतवादी ठार केल्याचे समोर आले आहे.

या घुसखोरीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत ५ पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.

(हेही वाचा – Manipur Violence: मणिपूरच्या इन्फाळमध्ये पुन्हा हिंसाचार; केंद्रीय मंत्र्याचे जाळले घर)

यापूर्वी लष्कराने गुरुवारी, १५ जूनला जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि नियंत्रण रेषेजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान ही जप्ती करण्यात आली असून त्यात स्टील कोर काडतुसे आणि पाकिस्तानमध्ये बनवलेल्या औषधांचाही समावेश आहे.

दरम्यान १३ जून रोजी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील दोबनार मच्छल भागात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ दहशतवादी ठार झाले होते.

हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.