पहिले तेलुगू नाटककार Chandala Kesavadasu

89
पहिले तेलुगू नाटककार Chandala Kesavadasu

चांदाला केशवदासू (Chandala Kesavadasu) हे पहिले तेलुगू नाटककार, पहिले चित्रपट गीतकार, कवी, अभिनेते, गायक, हरिकथा कलाकार, अष्टावधानी आणि शतावधानी होते. त्यांनी परब्रह्म परमेश्वर हे महान कीर्तन लिहिलं. हे कीर्तन पहिल्यांदाच नाटकांमध्ये गायलं गेलं आणि गाजलं. तसंच ‘भाले मांची चौका बेरामु पोइनन दोरूकडू’ हे गाणं संपूर्ण आंध्र प्रदेशात लोकप्रिय झालं. केशवदासू यांनी भक्त प्रल्हाद या पहिल्या तेलुगू चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. (Chandala Kesavadasu)

केशवदासू यांचा जन्म २० जून १८७६ साली खम्मम नावाच्या जिल्ह्यातल्या कुसुमांची मंडलातील जक्केपल्ली नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव चांदाला लक्ष्मीनारायण आणि आईचं नाव पापम्मा असं होतं. केशवदासू यांचे आजोबा चांदाला श्रीनिवासन हे खम्मम जिल्ह्यातल्या गंगीदेवीपाडु नावाच्या गावात राहायचे. ते मूळचे चांदावोली गावचे होते. म्हणून त्यांचं नाव चांदाला असं पडलं. ते त्या गावातले वैद्य होते. (Chandala Kesavadasu)

केशवदासू (Chandala Kesavadasu) यांचे बाबाही वैद्य होते. त्यासोबतच ते शेतीही सांभाळायचे. कालांतराने गंगीदेवीपाडू हे गाव सोडून जक्केपल्ली नावाच्या गावात राहायला गेले. लहानपणीच केशवदासू यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे त्यांना रस्त्याच्या कडेला झाडाखाली घेतल्या जाणाऱ्या एका शाळेत शिकावं लागलं. (Chandala Kesavadasu)

(हेही वाचा – White Ration Card: पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! जरुर वाचा)

भद्राचलम श्री रामुडच्या दर्शनासाठी तिरुवरू मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी तिरुवरूमध्ये केशवदासू यांनी धर्मशाळेची व्यवस्था केली होती. या धर्मशाळेमध्ये भाविकांना मोफत तांदूळ दान करण्यात येत असत. या संबंधीचा सगळा खर्च केशवदासू यांनीच केला होता. त्यांच्या तिरुवुरु आणि गम्पाला गुडेम भागात खूप ओळखी होत्या. त्या काळात ते अष्टावधानम आणि शतावधानम् ही गाणी म्हणत असत. (Chandala Kesavadasu)

त्यांनी अनेक मंदिरांसाठी गली गोपुरम देखील बांधले होते. अनेक धर्मग्रंथांमध्ये असलेल्या निरर्थक गोष्टी ते सहजतेने लोकांना पटवून देत असत. केशवदासू यांनी दिलेल्या त्यांच्या सेवेसाठी थिरुवुरु संस्थानने त्यांचा गौरव केला होता. १९३३ ते १९३५ सालादरम्यान तिरुवरु आणि आसपासच्या इतर भागांमध्ये स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. केशवदासू यांनी आपल्या गाण्यांनी लोकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना आणि चैतन्य जागृत केलं होतं. (Chandala Kesavadasu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.