घाटकोपरमध्ये कारखान्यात अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

81

घाटकोपर येथे सोमवारी सकाळी कपड्याच्या गोदामात भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. घाटकोपर येथील असल्फा सुंदर बाग येथील डिसिलव्हा कपाउंडमधील एका कारखान्याला ही भीषण लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय. कारखान्याला ही आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरातील लोकांची एकच धावाधाव सुरू झाली. ही आग सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या गाड्यांकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर परिसरात एका कपड्यांच्या गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली. कपड्याचं गोदाम असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. असेही सांगितले जाते की, या गोदामात फर्निचर, भंगाराचे ही गोडाऊन होते. काही क्षणात ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आग नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र आकाशातील धुराचे लोट पाहून गोदामाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला तत्काळ कळवले आणि त्यांच्या मार्फत या आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न करण्यात आले.

या भीषण आगीमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. साधारण 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. जवानांनी मोठे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे. आग लागलेले ठिकाण हे घाटकोपरमधील असल्फा हा टेकडी असलेला भाग असून या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.