Fight Between Women : चाळीतील महिलांच्या भांडणात गोळीबार, एका महिलेचा मृत्यू

झालेल्या भांडणाचे (Fight Between Women) कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते अशी माहिती स्थानिक सूत्राकडून समोर येत आहे.

125
Fight Between Women : चाळीतील महिलांच्या भांडणात गोळीबार, एका महिलेचा मृत्यू

चाळीमध्ये राहणाऱ्या दोन महिलांमध्ये वाद (Fight Between Women) होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मानखुर्द मधील मंडाळा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चाळीमध्ये राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात एका महिलेच्या पती आणि मुलाने दुसऱ्या महिलेला मारहाण करून तिच्यावर गोळीबार केला. ही घटना शनिवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

(हेही वाचा – हायवेने जाताय? आधी ‘हे’ नियम समजून घ्या)

या गोळीबारात (Fight Between Women) जखमी झालेल्या ३१ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला असून मानखुर्द पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मानखुर्द मंडाळा परिसर हादरून गेला आहे.

फरजाना इरफान शेख (३१) असे गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. फरजाना ही मानखुर्द मंडाळा परिसरात राहत असून त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत तिचे भांडण (Fight Between Women) झाले. हे भांडण कुठल्या कारणावरून झाले ते अजूनही समोर आलेले नाही. त्यामुळे या दोन महिलांमध्ये एका अज्ञात कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दुसऱ्या महिलेचा पती आणि मुलगा हे दोघे घरातून पिस्तुल घेऊन बाहेर पडले, व फरजाना हीला मारहाण करून तिच्यावर पिस्तुल मधून दोन गोळ्या झाडल्या, यादरम्यान स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता या बाप बेट्याने स्थानिकांवर पिस्तुल रोखून धमकी देत तेथून पळ काढला.

हेही पहा

या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिला फरजाना हिला तात्काळ राजावाडी रुग्णालयात भरती केले, मात्र डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले. मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला (Fight Between Women) असून या दोन्ही आरोपीच्या मागावर पोलीस पथक असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी दिली.

फरजाना आणि दुसऱ्या महिलेसोबत झालेल्या भांडणाचे (Fight Between Women) कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते अशी माहिती स्थानिक सूत्राकडून समोर येत आहे. हल्लेखोर हे सराईत गुंड असून त्यांच्यावर पूर्व उपनगरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर मानखुर्द परिसर हादरला असून स्थानिकामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.