Father of Research Laboratories : म्हणून गौरविलेले शास्त्रज्ञ शांती स्वरुप भटनागर

122
Father of Research Laboratories : म्हणून गौरविलेले शास्त्रज्ञ शांती स्वरुप भटनागर
Father of Research Laboratories : म्हणून गौरविलेले शास्त्रज्ञ शांती स्वरुप भटनागर
शांती स्वरूप भटनागर हे एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ होते. २१ फेब्रुवारी १८९४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांना सर शांती स्वरूप भटनागर म्हटले जायचे. तसेच(Father of Research Laboratories) म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांचा जन्म शाहपूर येथे झाला. आता हा भाग आता पाकिस्तानात आहे. त्यांचे वडील ते आठ महिन्यांचे असतानाच वारले. त्यांचे बालपण त्यांच्या माहेरच्या घरी गेले. त्यांचे आजोबा एक अभियंता होते, त्यांनी विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये त्यांची आवड निर्माण केली.(Father of Research Laboratories)
लहानपणापासून त्यांना यांत्रिकी खेळणी, इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि वायर्ड टेलिफोन बनवण्याची आवड होती. कवितेचा छंदही त्यांना त्यांच्या आजोबांकडून मिळाला आणि उर्दू एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक देखील त्यांनी पटकावला आहे. (Father of Research Laboratories)भारतात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते संशोधन फेलोशिपवर इंग्लंडला गेले. रसायनशास्त्राचे प्राध्यापक फ्रेडरिक जी डोन्नान यांच्या मार्गदर्शनाखाली १९२१ मध्ये लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून त्यांनी डॉक्टरेट ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. (Father of Research Laboratories)
भारतात परतल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी आग्रहास्तव प्राध्यापक पद स्वीकारले. १९४१ मध्ये, त्यांच्या संशोधनासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने नाइटहूड पुरस्कार देऊन सन्मानित केले. १८ मार्च १९४३ रोजी त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. इमल्शन, कोलोइड्स आणि औद्योगिक रसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.
त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. रासायनिक अभिक्रियांबद्दल अधिक समजून घेण्यासाठी त्यांनी चुंबकत्वाचा एक साधन म्हणून वापर केला. त्यांनी प्रा. आर.एन. माथूर यांच्यासोबत भटनागर-माथूर इंटरफरेन्स बॅलेन्स मांडला होता, जो नंतर एका ब्रिटीश कंपनीने उत्पादनात वापरला होता. त्यांना साहित्यात रुची असल्यामुळे कुलगीत नावाचे एक सुंदर विद्यापीठ गीतही त्यांनी रचले. विद्यापीठातील कार्यक्रमांपूर्वी हे गीत म्हटले जायचे.
ते (Council of Scientific and Industrial Research) (CSIR) चे महासंचालक होते. तसेच(University Grants Commission) (UGC) चे पहिले अध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे. त्यांच्या अद्वितीय कार्यासाठी त्यांना(Father of Research Laboratories) (संशोधन प्रयोगशाळेचे जनक) म्हटले जाते.
शांती स्वरूप भटनागर हे एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ होते. २१ फेब्रुवारी १८९४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांना सर शांती स्वरूप भटनागर म्हटले जायचे. तसेच(Father of Research Laboratories) म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांचा जन्म शाहपूर येथे झाला. आता हा भाग आता पाकिस्तानात आहे. त्यांचे वडील ते आठ महिन्यांचे असतानाच वारले. त्यांचे बालपण त्यांच्या माहेरच्या घरी गेले. त्यांचे आजोबा एक अभियंता होते, त्यांनी विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये त्यांची आवड निर्माण केली.
लहानपणापासून त्यांना यांत्रिकी खेळणी, इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि वायर्ड टेलिफोन बनवण्याची आवड होती. कवितेचा छंदही त्यांना त्यांच्या आजोबांकडून मिळाला आणि उर्दू एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक देखील त्यांनी पटकावला आहे. भारतात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते संशोधन फेलोशिपवर इंग्लंडला गेले. रसायनशास्त्राचे प्राध्यापक फ्रेडरिक जी डोन्नान यांच्या मार्गदर्शनाखाली १९२१ मध्ये लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून त्यांनी डॉक्टरेट ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. (Father of Research Laboratories)
भारतात परतल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी आग्रहास्तव प्राध्यापक पद स्वीकारले. १९४१ मध्ये, त्यांच्या संशोधनासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने नाइटहूड पुरस्कार देऊन सन्मानित केले. १८ मार्च १९४३ रोजी त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. इमल्शन, कोलोइड्स आणि औद्योगिक रसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.(Father of Research Laboratories)
त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. रासायनिक अभिक्रियांबद्दल अधिक समजून घेण्यासाठी त्यांनी चुंबकत्वाचा एक साधन म्हणून वापर केला. त्यांनी प्रा. आर.एन. माथूर यांच्यासोबत भटनागर-माथूर इंटरफरेन्स बॅलेन्स मांडला होता, जो नंतर एका ब्रिटीश कंपनीने उत्पादनात वापरला होता. त्यांना साहित्यात रुची असल्यामुळे कुलगीत नावाचे एक सुंदर विद्यापीठ गीतही त्यांनी रचले. विद्यापीठातील कार्यक्रमांपूर्वी हे गीत म्हटले जायचे.
ते Council of Scientific and Industrial Research (CSIR) चे महासंचालक होते. तसेच University Grants Commission (UGC) चे पहिले अध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे. त्यांच्या अद्वितीय कार्यासाठी त्यांना (Father of Research Laboratories) (संशोधन प्रयोगशाळेचे जनक) म्हटले जाते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.