EPFO खातेधारकांनो… तुमच्या खात्यात जमा झालेल्या व्याजाची रक्कम ‘या’ 4 पर्यायांद्वारे तपासा 

75

नोकरदारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष २०२२ चे व्याजाचे पैसे नोकरदारांच्या खात्यात पाठवायला सुरूवात केली आहे. या आर्थिक वर्षाचे व्याज देण्यास ईपीएफओने सुरूवात केली आहे, या बातमीमुळे अनेक नोकदारांनी त्यांच्या खात्यातील रक्कम तपासण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या खात्यातील व्याजाची आलेली रक्कम तपासायची असेल तर या ४ पर्यायांद्वारे तपासता येणार आहे.

EPFO ने व्याजाची रक्कम पाठवण्यास सुरूवात केली असली तरी काही नोकरदारांच्या स्टेटमेंटमध्ये व्याजाची रक्कम दिसत नाही. या प्रकरणावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी सरकारने सॉफ्टवेअर अपडेट केले जात आहे. त्यामुळे काही नोकरदारांच्या स्टेटमेंटमध्ये व्याजाची रक्कम दिसत नाही. लवकरच ती दिसेल अशी आशा देखील व्यक्त करण्यात येत असल्याचे सांगितले.

(हेही वाचा – तुम्हाला माहिती आहे का? LPG गॅस कनेक्शन सोबत मिळतो इतक्या लाखांचा विमा)

‘या’ 4 पर्यायाद्वारे तपासा रक्कम

1. मिस कॉल सुविधा

तुम्हाला तुमच्या खात्यातील व्याजाची रक्कम (EPFO Interest) तपासायची असेल तर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस कॉल देऊन ते तपासू शकतात. त्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या.

2. अधिकृत संकेतस्थळ

epfindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही ही रक्कम तपासू शकतात. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला ई पासबुकवर जावे लागणार आहे. यानंतर तिथे तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरणं अनिवार्य असणार आहे.

3. उमंग अॅप्लिकेशन

पीएफच्या व्याजाची रक्कम तुम्ही उमंग अॅपद्वारे तपासू शकतात. हे अॅप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात. यानंतर पासबुकवर क्लिक करून तु्म्हाला तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड द्यावा लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP आल्यानंतर तुम्ही तुमचा पीएफ तपासू शकता.

4. SMS द्वारे तपासा

तुम्ही 7738299899 या नंबरवर एसएमएस करून तुमची रक्कम तपासू शकतात. यामध्ये EPFOHO लिहून मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला मेसेज येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.