Viral Video: वर्दीतला गायक; ‘या’ पोलिसाने गाणं गात जिंकलं लोकांचं मन…

120
Viral Video: वर्दीतला गायक; 'या' पोलिसाने गाणं गात जिंकलं लोकांचं मन...
Viral Video: वर्दीतला गायक; 'या' पोलिसाने गाणं गात जिंकलं लोकांचं मन...

वर्दीत नेहमी कडक स्वभावात वावरणार्‍या पोलिसांनाही मन असतं, त्यांनाही कुटुंब असतं आणि तेही माणूस असतात याचा अनेकांना विसर पडतो. कोणताही सण असला, मंत्री येणार असले किंवा अगदी एखादा वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी पोलिसांना बंदोबस्तावर राहावं लागतं. बर्‍याचदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असतो.

लोकांचे रक्षण करण्याचे काम असल्यामुळे जीव गमावण्याचीही भिती असते. कोरोना काळात पोलिसांनी सामान्य लोकांना केलेली मदत विसरता कामा नये. स्वतः जीव देशसेवेसाठी अर्पण करणाऱ्या या पोलिसांमध्ये एक कलाकार लपलेला असतो. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक पोलीस गाणं गाताना दिसतं आहे.

(हेही वाचा – व्हेल मासा इतका मोठा का असतो? काय आहे रहस्य?)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. साडे चार लाखांपेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लोकांना या पोलीसाची गायकी खूपच आवडली आहे. या पोलीसाचं नाव आहे रजत राठोड. रजत राठोड हे दिल्ली पोलीस विभागात नोकरी करतात. त्यांनी ’तू जाने ना’ हे गाणं गाऊन लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे.

रजत राठोड यांचा गोड आवाज इथे ऐका

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Rathor (@rajat.rathor.rj)

पोलीस कर्मचारी रजत राठोड गाणं गात असताना इतर पोलिस त्यांना साथ देत आहेत. कुणी पियानो वाजवत आहे तर कुणी ड्रम वाजवत आहे. यावर आलेल्या कमेंट्स खूपच गंमतीशीर आहेत. एकाने तर म्हटलं की ’हे गाणं ऐकून चोर चोरी करणं सोडून देईल.’ तुम्हालाही त्यांचं गाणं आवडलं ना?

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.