प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची रेल्वेने तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक

80

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची रेल्वेने तस्करी करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून 10 हजार रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे. विनायक शंकरराव जोशी (वय 54) राहणार शांतिनगर नागपुर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

( हेही वाचा: अजित पवार म्हणतात, देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान आमदार )

पुढील तपास सुरु

रेल्वेत वाढणाऱ्या चोरीच्या घटना लक्षात घेता रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर असताना, दरम्यान इतवारी- छिंदवाड़ा मार्गावर आरोपी विनायक मोठी बॅग घेऊन प्रवास करताना दिसला. लागलीच त्याला ताब्यात घेत तपासले असता, त्याच्याकडून 10 हज़ार रुपये किंमतीचे महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखू आढळले. जोशी याला ताब्यात घेत रेल्वे कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.