15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरण : ‘या’ लसीकरण केंद्रात करू शकता नोंदणी

67

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 3 जानेवारीपासून लसीकरण केले जाणार आहे. मुंबईतील 9 ठिकाणी 9 लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी 1 जानेवारीपासून ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात  होणार आहे. केवळ कोव्हॅक्सिन लस दिली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

लसीकरणाची मोहिम

मुंबईत 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पालिका, शासकीय खासगी अशी एकूण 451 लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. आता 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहिम 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानुसार सध्या 2007 मध्ये किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मुलांना लस घेता येणार आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीकरणाची सुरुवात जम्बो लसीकरण  केंद्रामध्ये किंवा मोकळ्या रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे.

( हेही वाचा :‘#कैलेंडर _बदलें_संस्कृति_नही’ का होतंय ट्विटरवर ट्रेंड?)

लसीसाठी कोविन पोर्टलवर नोंदणी कशी कराल?

  • कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
  • नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
  • त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
  • लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.
  • पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
  • तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.
  • तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
  • तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.

मुंबईतील ही आहेत लसीकरण केंद्रे

  • आर.सी. भायखळा कोविड लसीकरण केंद्र
  • सोमय्या जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • एनएससीआय डोम, जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र एच / प
  • नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • दहीसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • क्रॉम्प्टन अँड ग्रीव्हस् जम्बो लसीकरण केंद्र
  • आर सी मुलुंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.