Rainfall : सप्टेंबर महिन्यात लवकर पाऊस गाशा गुंडाळणार?

राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत तापमान अधिक तर पाऊस कमी

38
Rainfall : सप्टेंबर महिन्यात लवकर पाऊस गाशा गुंडाळणार?
Rainfall : सप्टेंबर महिन्यात लवकर पाऊस गाशा गुंडाळणार?
सध्या पंजाब हरियाणा राजस्थान सौराष्ट्र व कच्छसह संपूर्ण वायव्य भारतात लागोपाठ अनेक दिवस पावसाची गैरहजरी, आर्द्रतेच्या टक्केवारीतील होणारी हळूहळू घसरण व निरभ्र आकाश ह्यासारखे वातावरणीय बदल नकळत परतीच्या पावसाचेच वेध दर्शवू लागले आहेत असे संकेत हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. याबाबत हवामान विभागाने मात्र अधिकृत माहिती दिलेली नाही.
मात्र गुरुवारी बंगालच्या उपसागरात ४ विविध ठिकाणी उंचीच्या पातळीवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती जाणवत आहे. ४ सप्टेंबर दरम्यान अजुन एक चक्रीय वारा प्रणाली स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. ह्या सर्व घडामोडी देशात सप्टेंबर च्या पावसासाठी अनुकूल ठरु शकतात असे वाटते. महाराष्ट्रासाठी या वातावरणाचा काय फायदा होऊ शकतो, हे आता निश्चित सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.

(हेही वाचा- Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांनी घेतली भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद याची भेट !)

राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत तापमान अधिक तर पाऊस कमी
मुंबईसह कोकण व सह्याद्री घाटमाथ्यावर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरु झाला होता. उष्णतेत झालेली सध्याची अतिवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर करणारी आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता असुन दुपार व पहाटेचे अनुक्रमे कमाल व किमान तापमानही सरासरी पेक्षा अधिक असण्याची शक्यता जाणवते, अशी भीती हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली. सध्या महाराष्ट्रात विदर्भ वगळता  दुपारच्या कमाल तापमानातही सरासरी पेक्षा २ अंशाने वाढ झाली आहे. कोकण व सह्याद्री घाटमाथ्यावर १० सप्टेंबरपर्यंत केवळ मध्यम ते मुसळधार पावसाचीच  शक्यता जाणवत आहे. रब्बी हंगामात स्थिती पाहून व हवामान व कृषी विभाग ह्यांच्या सूचनानुसारच जपून पावले टाकावीत, असे आवाहन त्यांनी केले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=Q3H88tquges

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.