India : भारताचा अमेरिकासोबत सर्वात मोठा करार; वायू दलाची प्रचंड शक्ती वाढणार

29
भारत – अमेरिका संरक्षण करारात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकन संसदेने (यूएस काँग्रेस) भारतीय हवाई दलासाठी लढाऊ जेट इंजिन तयार करण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. हा करार भारतीय सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि अमेरिकन जीई एरोस्पेस यांच्यात आहे. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा भारत आणि अमेरिकेत हा करार करण्यात आला होता. आता यूएस काँग्रेसने भारतासोबत जीई जेट इंजिन कराराला मान्यता दिल्याने पुढील मार्ग मोकळा झाला आहे.
या करारांतर्गत, लढाऊ जेट इंजिनांची निर्मिती, भारतात जेट इंजिनचे उत्पादन आणि परवाना देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान अभूतपूर्व तंत्रज्ञान हस्तांतरण होणार आहे. या करारानुसार, जीई एरोस्पेस F414 फायटर जेट इंजिनाच्या भारतातील निर्मितीसाठी ८० टक्के तंत्रज्ञान हस्तांतरीत करणार आहे. याचा उद्देश लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) MK2 (MKII) ची क्षमता वाढवायची आहे. MK2 सध्या उत्पादन सुरू आहे. या करारात हवाई दलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट Mk2 प्रोग्राममध्ये भारतातील GE एरोस्पेससह F414 इंजिनचे संयुक्त उत्पादन समाविष्ट आहे. HAL चे प्रमुख सीबी अनंतकृष्णन या भागीदारीला गेम चेंजर मानतात. कारण यामुळे स्वदेशी इंजिनांसाठी पाया रचला जात आहे ज्याने आगामी काळात लष्करी लढाऊ विमानांना शक्ती देतील. भारत- अमेरिका करारामध्ये ९९ जेट इंजिनांच्या संयुक्त निर्मितीचाही समावेश आहे. अमेरिकेतून तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे या उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे. GE Aerospace च्या F414 इंजिनची कार्यक्षमता चांगली आहे आणि ते विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. GE Aerospace गेल्या ४ दशकांपासून भारतासोबत काम करत आहे. या करारामुळे इंजिन, एवियोनिक्स, सर्व्हिस, इंजिनिअरींग, स्थानिक सोर्ससह भारताला सुविधा वाढण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.