Coastal Road Project: अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद मिटला; वरळीतील समुद्रात दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय

135

मागच्या पाच वर्षांपासून BMC आणि मच्छिमारांमध्ये सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील खाबांमधील अंतरावरुन महापालिका आणि वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांमध्ये हा वाद सुरु होता. कोस्टल रोड प्रकल्पात वरळी इथल्या समुद्रात दोन खांबांमधील अंतर 60 मीटर ठेवण्यात आले होते. वरळी- कोळीवाडा इथल्या क्लिव्हलॅंड जेट्टीमधून मच्छिमारांच्या शेकडो बोटी दररोज मासेमारीसाठी समुद्रात जातात. खांबांमधील कमी अंतरामुळे बोटींचा अपघात होण्याची भीती व्यक्त करत मच्छिमारांनी हे अंतर 200 मीटर ठेवण्याची मागणी केली होती.

( हेही वाचा: मुंबईतील वन अविघ्न इमारतीला भीषण आग; काही नागरिक आगीत अडकल्याची माहिती )

11 पैकी 5 खांबांचे बांधकाम पूर्ण

कोस्टल रोड प्रकल्पात एकूण 11 खांबांचे बांधकाम होणार असून 5 खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 7 पासून पुढे होणा-या खांबांच्या कामांमध्ये क्रमांक आठ हा खांब कमी करुन 7 ते 9 या दोन खांबांमधील अंतर 120 मीटर असणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाविषयी

  • मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • एकूण 10.58 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे- वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे.
  • प्रकल्पांमध्ये 4+4 मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.
  • किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, 2018 मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे.
  • या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारण्यासाठी मदत होणार आहे.
  • एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळीदेखील कमी होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.