चेंबूर कॅम्प परिसरात ठाकरे गटाच्या आजी माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये ‘या’ कारणावरुन तुफान राडा

142

मुंबईच्या चेंबूर कॅम्प परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे गटाच्या आजी आणि माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये मध्यरात्री तुफान राडा झाला. शाखेच्या जागेवरुन आजी- माजी महिला शाखाप्रमुखांमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान हा राडा झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन उद्धव ठाकरे गटाचे आजी- माजी महिला शाखा प्रमुखांसह सर्व कार्यकर्त्यांना समजावून पोलीस स्टेशनला नेले आहे.

( हेही वाचा: पंढरपूर शहरात तब्बल 137 धोकादायक इमारती; पालिका प्रशासनाचे भाविकांना निवास न करण्याचे आवाहन )

ठाकरे आणि शिंदे गटात झाला होता वाद

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु त्यानंतर पु्न्हा वाद उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.