Chandrayaan-3 : महाराष्ट्राचे चंद्रयान मोहिमेत काय आहे योगदान?

चंद्रयान-3 चे महत्त्वाचे भाग मुंबईतील गोदरेज एअरोस्पेसमध्ये बनवण्यात आले खामगावची चांदी शुद्ध असल्याने ती चंद्रयान-३ साठी स्टर्लिंग ट्यूबमध्ये वापरली

146

इस्रोच्या तिसऱ्या महत्वाकांक्षी चंद्र मोहिमेला सुरुवात झाली, शुक्रवारी, १४ जुलै रोजी चंद्रयान-३ ने यशस्वीरित्या आकाशात झेप घेतली. चंद्रयान-३ अवघ्या ४० दिवसात चंद्रावर पोहचण्याची शक्यता आहे. देशासह संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या ‘मिशन मून’ कडे लागलं आहे. भारताच्या चंद्र मोहिमेत महाराष्ट्राचही योगदान आहे. चंद्रयान-3 चा महत्त्वाचे भाग मुंबईतील गोदरेज एअरोस्पेसमध्ये बनवण्यात आले आहेत, तसेच बुलढाणा येथील चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर चांद्रयान-3 मध्ये करण्यात आला आहे.  पुणे येथील दोन मुलांनी चांद्रयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दोन सुपुत्रांनी एक महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या मोहिमेत आसिफभाई महालदार व मयुरेश शेटे यांचे योगदान आहे. आसिफभाई महालदार हे रिलायन्स फायर सिस्टीममध्ये आहेत आणि मयुरेश शेटे हे इस्त्रोचे शास्त्रज्ञ आहेत. आसिफभाई महालदार हे उद्योजक आहेत. रिलायन्स फायर सिस्टीम्स ही त्यांची कंपनी आहे. या मोहिमेसाठी त्यांच्या कंपनीला सहा कोटींचे कंत्राट मिळाले होते. चंद्रयान मोहिमेदरम्यान काही धोका निर्माण झाल्यास मोठी आग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात करावी लागणार होती. ही आग विझवण्याची यंत्रणा आसिफभाई महालदार यांच्या कंपनी रिलायन्स फायर सिस्टीमने पुरविली होती. श्रीहरिकोटा येथे ही यंत्रणा बसवण्यात आली.

गोदरेज ग्रुपच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीने इस्रोला भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेसाठी इंजिनसह काही महत्त्वपूर्ण घटकांचा पुरवठा केला आहे. इंजिनसाठी हे महत्त्वाचे भाग गोदरेजच्या मुंबईतील विक्रोळी प्लांटमध्ये तयार केले गेले. गोदरेज कंपनीने लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल्ससह इंजिन घटकांचा पुरवठा केला आहे. गोदरेज एरोस्पेसने या योगदानासह चंद्रयान आणि मंगळयान सारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गोदरेज एरोस्पेसचे बिझनेस हेड ‘मानेक बेहरामकामदीन’ म्हणाले, “इस्रोच्या चंद्रयान-३ मोहिमेतील आमच्या योगदानाचा आम्हाला खूप अभिमान आहे.

(हेही वाचा चांद्रयान ३ : केवळ सहाशे कोटींची मोहीम; इस्रोच्या कामगिरीचे चीनसह जगभरातून कौतुक)

चंद्रयान-३ मोहिमेत खामगावचे प्रसिद्ध चांदी आणि खामगावचे प्रसिद्ध कापड वापरण्यात आले. खामगावची चांदी देशभरात प्रसिद्ध आहे. चांदी वजनाने हलकी असल्याने ती चंद्रयान-3 मध्ये वापरली गेली. खामगावची चांदी शुद्ध असल्याने ती चंद्रयान-३ साठी स्टर्लिंग ट्यूबमध्ये वापरली गेली.

खामगाव येथील विक्रमशी फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडने चंद्रयान-३ साठी आवश्यक थर्मल शील्डचा पुरवठा केला. चंद्रयानाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी लागणारे रबरयुक्त फॅब्रिक  विक्रमशी फॅब्रिक्स यांनी तयार केले. चंद्रयान-३ मोहिमेत याचा वापर करण्यात आला आहे.

चंद्रयान-३ मध्ये इंदापूरच्या वालचंदनगर कंपनीचा मोठा वाटा 

चंद्रयान-3 मध्ये वापरलेले चार बूस्टर वालचंदरनगर कंपनीने बनवले आहेत. हे बूस्टर घन इंधनाने भरलेले. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये हेड एंड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोजल एंड सेगमेंट आणि प्लेक्स नोजल कंट्रोल टॅक सारख्या महत्वाच्या उपकरणांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी, या कंपनीने 2019 चंद्रयान-2 मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. चंद्रयान-2 साठी सहा बूस्टर तयार करण्याचे काम या कंपनीने केले होते. वालचंदनगर कंपनीने मंगळयान मोहिमेतही योगदान दिले. वालचंदनगर कंपनीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या विकासात आघाडीची भूमिका बजावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.