ISRO : चंद्रयान-3 लँडर विक्रमची चंद्रयान-2 च्या रडारने काढलेले फोटो इस्त्रोने केले शेअर

चंद्रयान-3 च्या लँडरची प्रतिमा बुधवारी चंद्रयान-2 ऑर्बिटरवर ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाद्वारे घेण्यात आली

96
ISRO : चंद्रयान-3 लँडर विक्रमची चंद्रयान-2 च्या रडारने काढलेले फोटो इस्त्रोने केले शेअर
ISRO : चंद्रयान-3 लँडर विक्रमची चंद्रयान-2 च्या रडारने काढलेले फोटो इस्त्रोने केले शेअर

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने शनिवारी (९ सप्टेंबर) चंद्रयान-3 लँडर विक्रमची चंद्रयान-2 ऑर्बिटरवरील उपकरणाद्वारे घेतलेले नवीन छायाचित्र ट्विटर च्या माध्यमातुन जाहीर केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शेअर केलेल्या चंद्रयान-3 च्या लँडरची प्रतिमा बुधवारी चंद्रयान-2 ऑर्बिटरवर ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाद्वारे घेण्यात आली. सूर्य प्रकाश नसला तरी हे रडार छायाचित्र मिळवून देते. यामुळे वस्तुमधील अंतर समजते आणि वैशिष्टांची माहिती देखील मिळते. त्यामुळे SARचा वापर पृथ्वीच्या पृष्ठभागाची आणि अवकाशातील गोष्टींची रिमोट सेन्सिंग करण्यासाठी वापरले जाते.

६ सप्टेंबर २०२३ रोजी चंद्रयान-2 ऑर्बिटरवर ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) उपकरणाने घेतलेल्या चंद्रयान-3 लँडरचे छायाचित्र येथे आहे,” असे अवकाश संस्थेने ट्विटरवर म्हटले आहे. ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडार (DFSAR) हे चांद्रयानवरील महत्वाचं उपकरण आहे.

(हेही वाचा  : G-20 Summit : जी-२० परिषदेत भारताला मोठे यश; ‘नवी दिल्ली लीडर्स’ घोषणापत्र मंजूर )

हे अत्याधुनिक साधन सध्या कोणत्याही ग्रह मोहिमेवर सर्वोत्तम रिझोल्यूशन ध्रुवीय छायाचित्र टिपण्यात येत. ASAR उपकरणांकडून दिलेल्या वारंवरितेच्या माईक्रोवेव्स पाठवल्या जातात आणि पृष्ठभागावरुन परावर्तित होऊन पुन्हा त्यांच वारंवारितेच्या वेव्स मिळतात. चंद्रयान-3 लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे ६०० किमी खाली आले आहे, असे नासाने म्हटले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-3 लँडर ‘विक्रम’चे छााचित्र जारी केली आहे. हे छायाचित्र लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर यानाने टिपली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.