Chandrayaan-3 : चांद्रयान- 3 यानाने पाठवला पहिला फोटो

270
Chandrayaan-3 : चांद्रयान- 3 यानाने पाठवला पहिला फोटो

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 (Chandrayaan-3) मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) शनिवारी (5 ऑगस्ट) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रं घेतली आहेत.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी Chandrayaan-3 पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवले. याला ट्रान्सलुनर इंजेक्शन (TLI) म्हणतात. यापूर्वी, चांद्रयान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते, ज्याचे पृथ्वीपासून किमान अंतर 236 किमी आणि कमाल अंतर 1,27,603 किमी होते. अशातच 5 ऑगस्टला ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले असून 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल.

ट्रान्सनर इंजेक्शनसाठी, इस्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयातील शास्त्रज्ञांनी काही काळ चांद्रयानचे (Chandrayaan-3) इंजिन सुरू केले. चांद्रयान पृथ्वीपासून २३६ किमी अंतरावर असताना इंजिन फायरिंग करण्यात आले. इस्रोने म्हटले आहे की, चांद्रयान-3 पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राकडे सरकत आहे. इस्रोने अंतराळयान ट्रान्सलुनर कक्षेत ठेवले आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे 14 दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे शोधून काढणार आहे. चंद्राच्या मातीचाही अभ्यास करणार आहे.

(हेही वाचा – Legislative Council : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा)

चांद्रयान-३ चा आतापर्यंतचा प्रवास…

14 जुलै रोजी चांद्रयान- 3 (Chandrayaan-3) 170 किमी x 36,500 किमीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले.

15 जुलै रोजी प्रथमच कक्षा 41,762 किमी x 173 किमी इतकी वाढवण्यात आली.

17 जुलै रोजी, कक्षा दुसऱ्यांदा 41,603 किमी x 226 किमी इतकी वाढवण्यात आली.

18 जुलै रोजी, कक्षा तिसऱ्यांदा 5, 1400 किमी x 228 किमी पर्यंत वाढविण्यात आली.

20 जुलै रोजी, कक्षा चौथ्यांदा 71,351 x 233 किमी पर्यंत वाढवण्यात आली.

25 जुलै रोजी, कक्षा पाचव्यांदा 1.27,603 किमी x 236 किमी पर्यंत वाढविण्यात आली.

31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री चंद्राने पृथ्वीची कक्षा सोडली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.