नवाब मलिक यांच्या मुलावर धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

93

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलावर आता गुन्हा दाखल झाला आहे. कुर्ला पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. मोहम्मद इकबाल मोहम्मद इस्लाम मलिक असे नवाब मलिक यांच्या मुलाचे नाव आहे.

(हेही वाचा – नवाब मलिकांना मोठा धक्का; ED जप्त करणार संपत्ती ?)

घाटकोपर या ठिकाणी राहणारे तक्रारदार विनोद सोनकांबळे यांनी गेल्या महिन्यात नवाब मलिक यांचा मुलगा मोहम्मद इकबाल मोहम्मद इस्लाम मलिक याच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत महानगर पालिकेत तक्रार दाखल केली होती. बेकायदेशीर बांधकामाची तक्रार केल्यामुळे संतापलेल्या मोहम्मद इकबाल मोहम्मद इस्लाम मलिक यांनी तक्रारदार विनोद सोनकांबळे यांना मनपाच्या एल विभागात गाठून “मेरी कम्प्लेट करता है क्या, अब तेरे को दिखाता हु, अशी धमकी तक्रारदाराला दिली.

अद्याप कुठलीही कारवाई नाही

तक्रारदार विनोद सोनकांबळे यांनी या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांचा मुलगा मोहम्मद इकबाल मोहम्मद इस्लाम मलिक याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसांनी भा.द.वि. कलम ५०४, ५०६ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदार यांच्याकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.