UIDAI: तक्रार निवारण निर्देशांकात ‘आधार’ अव्वल स्थानी!

95

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या ऑक्टोबर 2022 महिन्यासाठी प्रकाशित केलेल्या क्रमवारी अहवालात सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे Unique Identification Authority of India (UIDAI) पुन्हा सर्व गट अ मंत्रालये, विभाग आणि स्वायत्त संस्थांमध्ये अव्वल स्थानी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण सलग तिसऱ्या महिन्यात क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे.

(हेही वाचा – नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शालिमार LTT एक्स्प्रेसला भीषण आग)

रहिवाशांचा अनुभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने आपला नवीन AI/ML अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता/ यंत्र प्रशिक्षण आधारित चॅटबॉट, आधार मित्र चे देखील अनावरण केले. नवीन चॅटबॉट मध्ये सुधारित वैशिष्ट्ये आहेत. जसे – आधार नोंदणी/ताजी स्थिती तपासणे, आधार पीव्हीसी कार्ड स्थितीचा मागोवा घेणे, नोंदणी केंद्राच्या स्थानाची माहिती इ. रहिवासी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात आणि आधार मित्र वापरून त्यांचा पाठपुरावा करू शकतात.

भारतीय आधार प्राधिकरणाकडे एक मजबूत तक्रार निवारण यंत्रणा आहे. ज्यामध्ये UIDAI मुख्यालय, त्याची प्रादेशिक कार्यालये, तंत्रज्ञान केंद्र आणि संपर्क केंद्र भागीदार यांचा समावेश आहे. UIDAI हे राहणीमानात सुलभता आणि व्यवसायात सुलभता या दोन्हीसाठी एक सुविधा प्रदाता आहे आणि आधार धारकांना उत्तरोत्तर चांगला अनुभव देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहे. नागरिक केंद्रित समन्वित दृष्टीकोनासह भारतीय आधार प्राधिकरण एका आठवड्यात जवळपास 92% ग्राहक हितसंबंध व्यवस्थापन तक्रारींचा निपटारा करण्यास सक्षम आहे.

ही संस्था राहणीमान सुलभ करत आहे आणि तिची तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे. UIDAI हळूहळू प्रगत आणि भावी ओपन-सोर्स (खुले) ग्राहक हितसंबंध व्यवस्थापन उपाय उपलब्ध करत आहे. नवीन ग्राहक हितसंबंध व्यवस्थापन (CRM) उपायांची रचना रहिवाशांना UIDAI सेवा वितरण वाढविण्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह करण्यात आली आहे. नवीन सीआरएम उपायांमध्ये दूरध्वनी, ईमेल, चॅटबॉट, वेब पोर्टल, सोशल मीडिया, पत्र आणि वॉक-इन यांसारख्या बहुविध -माध्यमांना समर्थन देण्याची क्षमता आहे ज्याद्वारे तक्रारी नोंदवल्या जाऊ शकतात, त्यांचा पाठपुरावा केला जाऊ शकतो आणि त्यांचा प्रभावीपणे निपटारा केला जाऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.