वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

177
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला (सी-लिंक) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी (२८ जून) मान्यता दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल २५ निर्णय घेत शिंदे-फडणवीस सरकारने विक्रम रचला आहे. यावेळी वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यासह मुंबई-शिवडी पारबंदर (एमटीएचएल) प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्यास मंजुरी देण्यात आली.

(हेही वाचा – मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी)

त्याशिवाय राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी २१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे या प्रकल्पाला बळ मिळणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय

• भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

• महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.

• संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ

• आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.
करोडो कामगारांना लाभ मिळणार

• नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश

• मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.

• पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार

• मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड

• भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण

• मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये

• राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र

• सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन
पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार

• बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित

* जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता

* राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता

• बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय

• दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार

• दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ

• देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता

• चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

• सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ

• गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता

• ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

• पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार

  • पर्यटन उपविभागासाठी उप सचिव

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.