बापरे! संसद भवनात कोरोनाचं थैमान; ४००हून अधिक कर्मचारी पॉझिटिव्ह

98

देशभरातील कोरोनाचा कहर आता दिल्लीतील संसद भवनापर्यंत जाऊन धडकला आहे. संसद भवनातील 400 हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 400 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळतेय.

राजधानी दिल्लीतील कोरोनाचा कहर

शनिवारी दिल्लीत कोविडचे 20,181 नवीन रुग्ण आढळले, जे गेल्या आठ महिन्यांतील सर्वाधिक आहे. यापूर्वी 5 मे रोजी एकाच दिवसात सर्वाधिक 20,960 रूग्णांची नोंद करण्यात आली होती. नवीन रूग्णांमुळे राजधानी दिल्लीतील कोरोनाचा कहर सुरू झाला असून संक्रमितांची संख्या 5,26,979 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 25,143 वर पोहोचली आहे.

दरम्यान, दिल्ली शहरातील कोविड संसर्गाचा दर 19.60 टक्क्यांवर गेला असून, जो गेल्या आठ महिन्यांतील उच्चांक आहे. दिल्ली आरोग्य विभागाच्या मते, गेल्या वर्षी 9 मे रोजी शहरातील सकारात्मकता दर 21.66 टक्के नोंदवला गेला होता. सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या वाढून 48,178 झाली आहे, जी 18 मे पासूनची सर्वाधिक आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा –‘लालपरी’ची सेवा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता दिल्ली सरकारने १४ रुग्णालयात बेड्सची संख्या ४ हजार ३५० वरून ५ हजार ६५० केली आहे. तसेच रुग्णालयातील आयसीयू बेड्स वाढवून २ हजार ७५ केले आहेत. बेड्सची संख्या वाढवण्यासोबत शनिवारपासून कोविड केअर सेंटर पुन्हा चालू केले आहेत. दिल्लीत ८ कोविड सेंटरमध्ये एकूण २ हजार ८०० बेड्स उपलब्ध केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.