मुंबईतील सुमारे ३० माजी नगरसेवकांचा परतीचा मार्ग खुला

100

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक प्रभाग खुल्या प्रवर्गात गणले असून यामुळे अनेक माजी नगरसेवकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील निवडणुकीत प्रभाग महिला राखीव झाल्याने अनेक नगरसेवकांना घरी बसावे लागले होते, परंतु आता तेच प्रभाग खुले झाल्याने सुमारे १९ माजी नगरसेवकांचा महापालिकेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये शिवसेनेच्या १४ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर आठ ते दहा माजी नगरसेविकांना महापालिकेचे दरवाजे खुले होणार आहे.

( हेही वाचा : माता न तू वैरीणी; वरळीतील पंचतारांकित हॉटेलच्या डस्टबिनमध्ये बाळाला फेकले)

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आल्याने ११० प्रभाग खुले झाले आहेत. हे खुले प्रभाग झाल्याने विद्यमान नगरसेविका तेजस्वीनी घोसाळकर,सुजाता पाटेकर, रिध्दी खुरसुंगे, माधुरी भोईर, मेहेर हैदर, प्रियंका सावंत, सुषमा राय, राजुल देसाई,प्रज्ञा भूतकर, आशा कोपरकर, स्नेहल मोरे, ज्योती हारुन खान, रुपाली आवळे, अश्विनी हांडे, अनिता पांचाळ, अश्विनी माटेकर,प्रिती पाटणकर, अरुंधती दुधवडकर आदींना घरी बसावे लागणार आहे. काँग्रेसचे राजेंद्र नरवणकर यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने रु

हे प्रभाग खुले झाल्याने त्यांसर्वांचे पती, दिर आदी महापालिकेत फिरण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपचे दिवंगत नगरसेवक सुनील यादव यांचा प्रभाग खुला झाल्याने त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका संध्या यादव यांचाही मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय अनेक पक्षांचे पदाधिकारी आता नरगसेवक बनण्यास इच्छुक आहे. प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांनी आपल्या पत्नीला किंवा मुलींना नगरसेवक म्हणून निवडून आणले होते, परंतु आता त्यांचे प्रभाग खुले झाल्याने त्यांचाही नगरसेवक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये शाहिदा खान यांचे पती हारुन खान, विनया सावंत यांचे पती विनय, निधी शिंदे यांचे पती प्रमोद, हेमांगी वरळीकर यांचे पती हरिष आदींनाही नगरसेवक बनण्याची संधी आली आहे.

तर मुंबई महापालिकेचे १०८ प्रभाग महिला झाल्याने यापैंकी स्वप्निल टेंबवलकर, दत्ता पोंगडे, कोकीळ, विश्वनाथ महाडेश्वर, राजपती यादव व विठ्ठल लोकरे यांच्या प्रभागात वर्षा टेंबवलकर, लता रहाटे, श्वेता राणे, मिनल जुवाटकर, अजंत यादव, सुनंदा लोकरे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. तसेच

डॉ सईदा खान यांचा प्रभाग खुला झाल्याने माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर आणि रमेश कोरगांवकर यांचा प्रभाग खुला झाल्याने अनिषा माजगावकर आदींचाही परत नगरसेविका बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या माजी नगरसेवकांचा फिरतीचा मार्ग मोकळा

  • शिवसेना : अभिषेक घोसाळकर, उदेश पाटेकर, भास्कर खुरसुंगे, योगेश भोईर, प्रमोद सावंत, कमलेश राय, दिपक भूतकर, सुधीर जाधव, सुरेश आवळे, बाबा हांडे, अशोक माटेकर, प्रकाश पाटणकर, अरुण दुधवडकर व समीर देसाई
  • काँग्रेस : मोहसीन हैदर, सुरेश कोपरकर,
  • भाजप : दिनेश पांचाळ, संध्या यादव,
  • अपक्ष : राजा रहेबर खान

या माजी नगरसेविकांचाही मार्ग मोकळा

  • शिवसेना : वर्षा टेंबवलकर, पुजा महाडेश्वर, श्वेता राणे, लता रहाटे, वैभवी चव्हाण, मिनल जुवाटकर, सुनंदा लोकरे, मंगला कदम
  • काँग्रेस : अंजता यादव, सुनीता वावेकर, अनाहिता मेहता

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.