Birthday Wishes For Best Friend in marathi: तुमच्या बेस्ट फ्रेंडला अशा द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

1594
Birthday Wishes For Best Friend in marathi: तुमच्या बेस्ट फ्रेंडला अशा द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Best Friend in marathi: तुमच्या बेस्ट फ्रेंडला अशा द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बेस्ट फ्रेंड म्हणजे खासमखास मित्र. ज्यासाठी जीव सुद्धा द्यायला आपण तयार होतो. त्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for best friend in marathi) देखील खास पद्धतीत दिल्या पाहिजेत. आम्ही तुमच्यासाठी असे काही संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला वाढदिवसाला (birthday wishes for best friend in marathi) पाठवू शकता.
birthday wishes for best friend in marathi
माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेणे.
प्रत्येक बिकट परिस्थितीत एकमेकांसोबत रहाणे.
हीच गोष्ट आपली मैत्री घट्ट होण्यास कारणीभूत आहे.
प्रिय मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
सुखात शंभर मिळाले
दुखात मिळाला एक
कठीण काळात सोबत
जो देई मित्र तोच नेक
अशाच माझ्या मित्राला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
आयुष्यात खूप सारी माणसं भेटतात
काही गरजेपुरती असतात काही सोडून जातात
मात्र काही तुझ्यासारखी मनात घर करून बसतात.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा
जे पाहशील स्वप्न
ते सत्यात उतरावं
दुःखाच्या जागी सुखाने यावं.
हिच त्या ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
तुझ्याबरोबरच दिवस सुरू होतो आणि तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही खास
कारण आज तुझा Birthday असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for best friend in marathi) देणारे संदेश?
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.