मोठी बातमी: जम्मूच्या नरवाल भागात दोन स्फोट; अनेक जण जखमी

129

जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी सकाळी नरवाल भागात दोन स्फोट झाले. या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत तर इतर सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी नरवाल येथे दोन वाहनांमध्ये स्फोट झाला. या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौ-यावेळी घुसखोरी करणा-या दोघांना अटक; एकाकडून घातक शस्त्रात्रे जप्त )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.