Bhiwandi : तीन मजली इमारत कोसळली; ५० हून अधिक माणसं ढिगाऱ्याखाली अडकले

घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दल यांनी धाव घेतली आहे. तसेच एनडीआरएफला देखील बोलवण्यात आले आहे.

176
Bhiwandi
Bhiwandi Building Collapsed : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी (Bhiwandi) येथील तीन मजली इमारत कोसळून त्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० माणसं अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे अवकाळी पावसामुळे ठाणेकर हैराण आहेत, अशातच ठाण्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक इमारत अचानक कोसळली. यात इमारतीच्या ढिगार्‍याखाली ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शनिवार २९ एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

(हेही वाचा – Unseasonal Rain : राज्यात ‘ऑरेंज’ व ‘यलो अलर्ट’, ठाण्यात सकाळपासूनच पावसाची हजेरी)

माहितीनुसार, वल ग्रामपंचायतीच्या (Bhiwandi) हद्दीत वर्धमान नावाची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीच्या तळ मजल्यावर एक गोदाम होते. त्या गोदामात ३० हून अधिक लोक काम करत होते. तर वरील सर्व मजल्यावर कुटुंब राहत होते. ही इमारत कोसळ्याने यात ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दल यांनी धाव घेतली आहे. तसेच एनडीआरएफला देखील बोलवण्यात आले आहे. अग्निशामक दालाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालील माणसांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे. ढिगाऱ्याखाली किती माणसं अडकली आहेत याचा नेमका आकडा सांगता येत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.