Bhagwan Das: भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कारप्राप्त आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ “भगवान दास”

154
Bhagwan Das: भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कारप्राप्त आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ
Bhagwan Das: भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कारप्राप्त आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ "भगवान दास"

भगवान दास यांचा जन्म वाराणसीमध्ये १२ जानेवारी १८६९ रोजी झाला. ते भारताचे प्रमुख शिक्षणतज्ञ होते. ॲनी बेझंट यांच्या भाषणाने प्रभावित होऊन ते थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये सामील झाले. या संस्थेनेमध्ये फूट पडल्यानंतर ते जिद्दू कृष्णमूर्ती यांचे विरोधक झाले. जिद्दू कृष्णमूर्ती हे खूप मोठे आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ होते.

भगवास दास यांनी स्वातंत्र्य चळवळीतदेखील भाग घेतला. असहकार आंदोलनादरम्यान ते कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यांनी काही काळ ब्रिटिशशासीत केंद्रिय विधानसभेतदेखील काम केले. त्यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापनादेखील केली. ते काशी विद्यापीठाचे प्राध्यापकदेखील होते. विशेष म्हणजे १९२१ मध्ये ते हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हिंदी आणि संस्कृतमध्ये त्यांनी तीसपेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.

(हेही वाचा –Weather Forecast: थंडीचा ऋतु असूनही उकाडा, नेमकं कारण काय? वाचा… हवामान विभागाचा अंदाज )

त्यांनी दर्शन का प्रयोजन, मनुपादानुक्रमणी, दर्शन का प्रयोजन, पुरुषार्थ, महावीर-वाणी, दर्शन का प्रयोजन, समन्वय, दर्शन का प्रयोजन, पुरुषार्थ, मीरा का काव्य इत्यादी पुस्तके लिहिली आहेत. १९५५ मध्ये भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. भारताचे सर्वोच्च न्यायालय असलेल्या दिल्लीतील प्रमुख रस्त्याला “डॉ. भगवान दास मार्ग” असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर वाराणसीतील एका विभागालादेखील त्यांचे नाव देण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.