BEST निर्णय! बसमधून प्रवास करताना मोठ्याने गाणी ऐकताय? आता ‘हे’ नियम पाळले नाहीतर पोलीस थेट करणार कारवाई!

154
BEST bus

रेल्वेनंतर बेस्ट (BEST) बस ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर बसने प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेक प्रवासी मोबाईलवर जोरजोरात बोलत असतात किंवा काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ/व्हिडिओ ऐकत किंवा बघत असतात. अनेकदा सहप्रवाशांकडून उच्च आवाजात गाणी ऐकली जातात परंतु याचा त्रास BEST बसमधील इतर प्रवाशांना होतो. यावर आता बेस्ट उपक्रमाने बेस्ट निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला आहे.

( हेही वाचा : रामसर यादीत आता देशातील 75 पाणथळ ठिकाणांचा समावेश)

बेस्ट उपक्रमाने घेतला BEST निर्णय

बेस्ट उपक्रमाकडून यासंबंधित परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तुमच्याकडे जर इथून पुढे बसमधून प्रवास करताना हेडफोन अथवा इयरफोन नसतील तर तुम्हाला मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकता किंवा बोलता येणार नाही. तसेच या नियमांचे पालन न केल्यास थेट पोलीस कारवाई होऊ शकते असे बेस्टने या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

New Project 11 3

( हेही वाचा : Eknath shide : मुख्यमंत्री शिंदेंची प्रथमच उद्धव ठाकरेंवर आक्रमक टीका; म्हणाले… )

बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा असून बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होऊ नये यासाठी मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम ३८/११२) सदर प्रवाशावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे इयरफोनशिवाय मोबाईलवर ऑडिओ/व्हिडिओ ऐकण्यास/बघण्यास तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत आहे असे बेस्ट उपक्रमाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

 

BEST
BEST

हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.