100@ Mann Ki Baat : ‘मन की बात’ शंभरावा भाग होणार प्रसारित! केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘या’ अनोख्या उपक्रमांचे आयोजन

148
Mann Ki Baat

येत्या रविवारी मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे, त्यानिमित्ताने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने तीन अनोखे उपक्रम हाती घेतले आहेत. मन की बात या वैशिष्ठ्यपूर्ण कार्यक्रमाचे यश साजरे करण्यासाठी मंत्रालयाने हे उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती केंद्रीय संस्कृती सचिव गोविंद मोहन यांनी दिली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि क्रांतिकारी उपक्रम ठरलेल्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या 30 एप्रिल रोजी आकाशवाणीवरुन प्रसारित होणार आहे.

( हेही वाचा : BEST निर्णय! बसमधून प्रवास करताना मोठ्याने गाणी ऐकताय? आता ‘हे’ नियम पाळले नाहीतर पोलीस थेट करणार कारवाई!)

मन की बात (Mann Ki Baat) शंभरावा भाग

मंत्रालयाच्या उपक्रमांविषयी तपशीलवार माहिती देताना गोविंद मोहन म्हणाले की सांस्कृतिक मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण क्षण साजरा करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या स्थळांसह देशभरातील 13 महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक प्रोजेक्शन मॅपिंगचा वापर करुन सादरीकरणे केली जाणार आहेत. हा उपक्रम 29 एप्रिलपासूनच सुरु होणार आहे. प्रत्येक स्मारकाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात त्या जागेचे ऐतिहासिक तसेच वास्तुकलेसंदर्भातील महत्त्व दाखविणारे कार्यक्रम होतील. तसेच पंतप्रधानांनी मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमात चर्चिलेले विविध विषय आणि संकल्पना यांच्या धर्तीवर हे कार्यक्रम एक देश म्हणून भारतात आढळणारे वैविध्य अधोरेखित करणारे असतील.

पुढील 13 महत्त्वाच्या ठिकाणी हे कार्यक्रम सादर होतील

दिल्ली येथील लाल किल्ला, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर किल्ला, ओदिशामधील कोणार्क सूर्यमंदिर, तेलंगणाचा गोवळकोंडा किल्ला, तामिळनाडूचा वेल्लोर किल्ला, महाराष्ट्रातील गेटवे ऑफ इंडिया, झारखंडचा नवरत्नगड, उधमपूरचा रामनगर किल्ला, उत्तर प्रदेशातील रेसिडेन्सी इमारत, गुजरातचे मोढेरा सूर्य मंदिर, आसामचे रंग घर, राजस्थानचा चितोडगड किल्ला आणि नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालय.

संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमासाठी नागरिकांना प्रवेश दिला जाईल. प्रोजेक्शन मॅपिंग शो प्रादेशिक भाषेत सादर होईल आणि आपल्या देशाचा इतिहास तसेच वारसा यांची विस्तृत माहिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल. या वेळी, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या प्रेरणेसह, स्मारकाचे ऐतिहासिक आणि वास्तुरचनेसंदर्भातील महत्त्व आणि मन की  बात (Mann Ki Baat) कार्यक्रमाची संकल्पना यावर भर दिला जाईल.

हेही पहा : 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.