बेस्ट खासगीकरणाच्या वाटेवर जात असल्याने आधीच कर्मचारी वर्गात असंतोष पसरला असताना आता जे कर्मचारी तीन महिन्यांमध्ये १५ किंवा १५ पेक्षा जास्त वैद्यकिय रजेचा (SL)वापर करतील अशा कर्मचाऱ्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात येईल असा फलक दिंडोशी आगारात लावण्यात आला आहे. त्यामुळे १५ दिवसापेक्षा जास्त रजा घेतल्यास आता कर्मचाऱ्यांना कामावर हजर होताना फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे.
( हेही वाचा : एसटी धावली, उत्पन्नात कोटीच्या घरात पोहचली! )
मेडिकलसाठी पाठवण्यात येईल असा फलक
दिंडोशी बेस्ट आगारात नव्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला त्रास होत असल्याचा आरोप अलिकडेच कामगारांनी केला होता. त्याबााबत त्यांनी भाजप बेस्ट कामगार संघटनेचे सल्लागार सुनील गणाचार्य यांच्याकडे तक्रारही केली होती. याची दखल घेऊन सुनील गणाचार्य यांनी ६ एप्रिल २०२२ रोजी दिंडोशी आगार येथे कामगारांना होणारा त्रास व अत्याचाराबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर आता दिंडोशी आगारातच १५ किंवा १५ पेक्षा जास्त वैद्यकिय रजेचा (SL) वापर करतील अशा कर्मचाऱ्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात येईल असा फलक लावण्यात आलेला आहे. या प्रकाराविषयी कामगारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.