Bat : वटवाघुळ राक्षस नसून माणसाचा मित्र; पर्यावरण ठेवतो स्वच्छ

भारतात वटवाघुळाच्या 135 जाती आहेत आणि जगभरात 1460 प्रकारच्या जाती पाहायला मिळतात.

99

वटवाघूळ दिसणं हे अशुभ मानलं जातं. वटवाघुळाच्या भोवती एक भितीदायक वलय आहे. भुताच्या सिनेमांमध्ये घाबरवण्यासाठी वटवाघुळाचा वापर केला जातो. काही लोक वटवाघुळाला राक्षस मानतात, भुताचं प्रतीक मानतात. मात्र बॅटमॅन हा सुपरहिरो यास अपवाद आहे.

जेव्हा जगभरात कोरोनाची साथ पसरली होती तेव्हा वटवाघुळाविषयी बऱ्याच अफवाही पसरल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना वटवाघुळ हा पक्षी आवडत नाही. कुणी हा पक्षी पाळण्याचा विचारही करणार नाही. कावळा आणि वटवाघुळ हे दोन पक्षी माणसांच्या प्रेमावाचून वंचित राहिले आहेत. तरी कावळ्याला धार्मिक कार्यामुळे आदर मिळतो. हा मान वटवाघुळाला नाही.

पण तुम्हाला माहिती आहे का? विचित्र दिसणारा पक्षी वटवाघुळ हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. पर्यावरण रक्षक आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वटवाघुळ महत्वाची भूमिका बजावतात. वटवाघळे पाचशे पेक्षा जास्त झाडांच्या बिजांचे परिवहन करतात.

(हेही वाचा Aurangzeb : औरंगजेब आणि मविआचा डीएनए एकच; चित्रा वाघ यांचा घणाघात )

आता केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट वटवाघुळ या पक्षाविषयी जनजागृती करत आहे. वटवाघुळ पक्षांवर रिसर्च करणारे नितीन दिवाकर म्हणतात, ‘आपल्या हाताच्या लहान बोटाएवढे वटवाघुळ ताशी चौदाशे किडे खातो.’ वटवाघळे किटकांपासून शेतीला नुकसान होणे टाळतात. म्हणजे तुम्हीच विचार करा, वटवाघुळ हे शेतीसाठी किती उपयोगी आहेत ते..

भारतात वटवाघुळाच्या 135 जाती आहेत आणि जगभरात 1460 प्रकारच्या जाती पाहायला मिळतात. दहा ग्रॅम वजनाचा एक वटवाघुळ 41 वर्षे जिवंत राहू शकतो. वटवाघुळ हा एकमेव सस्तन प्राणी आहे जो आकाशात उडू शकतो. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की, हल्लीच्या जंगलतोडीमुळे, प्रदूषण आणि जलवायूंचे असंतुलन या कारणांमुळे वटवाघळाच्या जाती नष्ट होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.