Atul Chitnis : लिनक्स सॉफ्टवेअरचे निर्माते अतुल चिटणीस

179
Atul Chitnis : लिनक्स सॉफ्टवेअरचे निर्माते अतुल चिटणीस
Atul Chitnis : लिनक्स सॉफ्टवेअरचे निर्माते अतुल चिटणीस
अतुल चिटणीस(Atul Chitnis) यांचा जन्म २० फेब्रुवारी १९६२ रोजी जर्मनीत झाला. ते भारतीय वंशाचे जर्मन संगणक अभियंता होते. पीसीक्वेस्ट’ या प्रसिद्ध नियतकालिकासाठी त्यांनी सहा वर्षे संपादकाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच लिनक्स हा सॉफ्टवेअर नेटकर्त्यांसमोर ठेवून त्यांनी खूप मोठे काम केले होते.(Atul Chitnis)
FOSS तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन
तंत्रज्ञानात पारदर्शकता आणण्याचं मोठं काम चिटणीस (Atul Chitnis) यांनी केलं आहे. फ्री ऍंड सोर्स सॉफ्टवेअर FOSS चे ते प्रणेते आहेत. १९९४ पासून ते नावारुपाला आले. बंगलोर लिनक्स युजर ग्रुप सारख्या FOSS कम्युनिटीसोबत काम करत असताना, त्यांनी सेमिनार आणि लेखांद्वारे FOSS तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले.(Atul Chitnis)
FOSS तंत्रज्ञानाविषयी जागरुकता चळवळ
चिटणीस हे लिनक्स बंगलोरच्या FOSS कम्युनिटी संचालित कॉन्फरन्सच्या आयोजकांपैकी एक होते. FOSS.IN हा आशियातील सर्वात मोठा वार्षिक FOSS कार्यक्रम असल्याचे म्हटले जाते. (Atul Chitnis) त्यांनी नॅशनल रिसोर्स सेंटर फॉर फ्री/ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये फॅकल्टी कमिटीचे सदस्य म्हणूनही काम केले. FOSS तंत्रज्ञानाविषयी त्यांनी जागरुकता चळवळ राबवली होती. मात्र त्यांचा हा प्रवास अचानक थांबला. ३ जून २०१३ रोजी कर्करोगामुळे त्यांना हे जग सोडून जावे लागले.(Atul Chitnis)
हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.