ATS : एटीएसची मोठी कारवाई; शिक्षक, इंजिनिअर आणि जिम ट्रेनर निघाले दहशदवादी

हिजब-उत-ताहरीर म्हणजेच HUT ची स्थापना १९५२ मध्ये जेरुसलेममध्ये झाली आणि आतापर्यंत ती ५० देशांमध्ये वाढली

34
ATS
ATS : एटीएसची मोठी कारवाई; शिक्षक, इंजिनिअर आणि जिम ट्रेनर निघाले दहशदवादी

भारतात स्लीपर सेलची सुरुवात झाली आहे का असा आता प्रश्न पडायला लागला आहे. मध्य प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) एनआयए सह मिळून १६ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि आयपीसीच्या इतर संबंधित तरतुदींनुसार ‘हिजब-उत-ताहरीर’ म्हणजेच HUT या दहशदवादी संघटनेसोबत संबंध असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे १६ आरोपी शिक्षक, इंजिनिअर आणि जिम ट्रेनर बनून समाजात वावरत होती. अशातच या १६ आरोपींचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे पुरावे मिळताच त्यांना एटीएस आणि एनआयए यांच्याकडून अटक करण्यात आली आहे. (ATS)

या सोळा आरोपींचे लक्ष्य भारतातील लोकशाही व्यवस्था मोडून काढणे आणि त्याऐवजी शरिया (इस्लामिक कायदा शासन) आणणे हे होते. मध्य प्रदेश पोलीस (ATS) प्रवक्ते यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की,”त्यांनी (आरोपी) हैदराबाद येथील कौशल्य प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतले. याशिवाय, ते धार्मिक सभांमध्ये प्रक्षोभक भाषणं देऊन आणि धार्मिक साहित्याचे वाटप करून ते इतर तरुणांना आकर्षित करत होते. (ATS)

(हेही वाचा – Muslim : लातूरमध्ये हिंदू जोडप्याला मारहाण करून मशिदीत धर्मांतर करण्याचा प्रयत्न)

या प्रकरणावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, “सर्व संशयित एटीएसच्या (ATS) रडारखाली होते. यावेळी एटीएसकडून आक्षेपार्ह साहित्य, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह आणि हार्डडिस्क इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.”

१६ पैकी १० जणांना भोपाळच्या शाहजहानाबाद, ऐशबाग, लालघाटी आणि पिपलानी परिसरातून, तर एकाला छिंदवाडा शहरातून अटक करण्यात आली. हैदराबाद येथून ५ जणांना अटक करण्यात आली. (ATS)

हेही पहा – 

“मध्य प्रदेशच्या (ATS) भूमीवर कोणत्याही दहशतवादी, गुंड आणि बदमाशांना स्थान नाही,” असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यापूर्वी राज्यात कट्टरतावादाच्या विरोधात कारवाई सुरू करताना सांगितले होते.

हिजब-उत-ताहरीर म्हणजेच HUT ची स्थापना १९५२ मध्ये जेरुसलेममध्ये झाली आणि आतापर्यंत ती ५० देशांमध्ये वाढली आहे. ही संघटना ISIS पेक्षाही धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. (ATS)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.