Anand Mahindra Viral Tweet : आनंद महिंद्रांनी जेव्हा अमेरिकेतील स्टोअरमध्ये भारतात बनलेला आयफोन १५ दाखवला…

ॲपल आणि सॅमसंग कंपन्यांनंतर गुगलनेही आपला पिक्सेल फोन भारतात बनवण्याचं ठरवलं आहे.

154
Anand Mahindra Viral Tweet : आनंद महिंद्रांनी जेव्हा अमेरिकेतील स्टोअरमध्ये भारतात बनलेला आयफोन १५ दाखवला…
Anand Mahindra Viral Tweet : आनंद महिंद्रांनी जेव्हा अमेरिकेतील स्टोअरमध्ये भारतात बनलेला आयफोन १५ दाखवला…
  • ऋजुता लुकतुके

अब्जाधीश उद्योगपती आनंद महिंद्रा आपले दैनंदिन अनुभव नेहमीच ट्विटरवर शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी अमेरिकेतला एक अनुभव सांगितला. सेल्सगर्लला आपला आयफोन १५ भारतात बनलेला आहे, असं त्यांनी सांगतातच तिची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती, असं ते म्हणतात. ॲपल आणि सॅमसंग कंपन्यांनंतर गुगलनेही आपला पिक्सेल फोन भारतात बनवण्याचं ठरवलं आहे आणि २०२४ मध्ये पहिला भारतात बनलेला गुगल पिक्सेल फोन तयारही होणार आहे. ही खुशखबर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विवरवर शेअर केली. त्याच्या उत्तरादाखल महिंद्रा सन्स कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी आपला अमेरिकेतील एक अनुभव सांगणारं ट्विट केलं आहे. (Anand Mahindra Viral Tweet)

सुंदर पिचाई यांची पोस्ट त्यांनी रिट्विट केली आणि त्यावर आपला अमेरिकेतील एक अनुभवही लिहिला. ते म्हणतात, ‘अलीकडेच मी अमेरिकेत व्हेरिझॉन स्टोअरमध्ये गेलो होतो. तिथे मला माझ्या आयफोन १५ साठी स्थानिक सिमकार्ड हवं होतं. मी सेल्सगर्लला माझ्या हातातला आयफोन १५ दाखवला आणि तो भारतात बनलेला आहे, असं अभिमानाने सांगितलं. आणि त्यानंतर तिने तिच्या भुवया ज्याप्रकारे उंचावल्या, ते पाहणं खूप आनंददायी आणि समाधानकारक होतं.’ (Anand Mahindra Viral Tweet)

(हेही वाचा – Liquor Prices Increase : आता मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार; जाणून घ्या कारण)

या ट्विटमध्ये पुढे महिंद्रा यांनी असंही लिहिलंय की त्यांच्याकडे गुगल पिक्सेलही आहे. आणि हा फोनही जेव्हा भारतात बनणं सुरू होईल, तेव्हा तो ते लगेच खरेदी करतील. महिंद्रा यांनी २० ऑक्टोबरला सकाळी ही पोस्ट शेअर केली त्यानंतर काही तासांतच आठ लाख लोकांनी ती पाहिली होती. (Anand Mahindra Viral Tweet)

अनेकांनी यावर भारताबद्दल अभिमान वाचत असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे. गुगलने भारतातील उत्पादन वाढवतानाच गुगल फॉर इंडिया असा प्रकल्प सुरू केला आहे. त्याअंतर्गत गुगल भारताबरोबर सहकार्याने काही गोष्टी करणार आहे. गुगल पिक्सेलचं उत्पादन ही त्यातील एक आहे. याशिवाय गुगल आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागात भारताचं सहकार्य घेणार आहे. तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या ॲपमध्ये भारतीय भाषांचा समावेश करणार आहे. (Anand Mahindra Viral Tweet)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.