अमेरिकेतील बिझनेसमन, रिसर्चर म्हणजेच संशोधक, फिजिशियन John Harvey Kellogg

89

जॉन हार्वे केलॉग (John Harvey Kellogg) यांचा जन्म २६ फेब्रुवारी १८५२ साली झाला. ते एक अमेरिकेतील बिझनेसमन, रिसर्चर म्हणजेच संशोधक, फिजिशियन होते. एवढेच नव्हे तर ते प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंटचे वकिलही होते. तसेच ते सेव्हेंथ डे ऍडव्हेंटिस्ट चर्चने स्थापन केलेल्या मिशिगन इथल्या बॅटल क्रीक सॅनिटेरियमचे संचालकही होते. यामध्ये हायड्रोथेरिपी, युरोपियन स्पा, उच्च दर्जाचे हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे. केलॉग यांनी प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत व्यक्तींवर तसेच ज्या गरिबांना हॉस्पिटल परवडत नाही, अशा लोकांवरही उपचार केलेले आहेत.

जॉन हार्वे केलॉग (John Harvey Kellogg) यांचा जन्म मिशिगन इथल्या टायरॉन येथे झाला. जॉन हार्वे यांचे वडील अनेक पुनरुज्जीवनवादी चळवळींचे सदस्य होते. त्यांमध्ये बाप्टिस्ट चर्च, काँग्रेशनलिस्ट चर्च आणि सेव्हेंथ डे ऍडव्हेंटिस्ट चर्च यांचा समावेश आहे. जॉन हार्वे केलॉग यांचं कुटुंब १८५६ साली बॅटल क्रीक येथे शिफ्ट झालं जेणेकरुन त्यांना चळवळीच्या इतर सदस्यांच्या जवळ राहता येईल.

(हेही वाचा Veer Savarkar : ज्यांना स्वातंत्र्य हवं, त्यांनी रणांगणात लढायला सिध्द झालं पाहिजे!)

बॅटल क्रीक इथल्या सार्वजनिक शाळांमध्ये जॉन हार्वे केलॉग यांनी वयाच्या अकरा वर्षांपर्यंत शिक्षण घेतले. पण त्यांच्या पालकांना त्यांचं शिक्षण फारसं महत्वाचं वाटलं नाही. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या झाडू कारखान्यात झाडूंचे वर्गीकरण करण्याचं काम दिलं. तेव्हा त्यांना शाळा सोडून द्यावी लागली. पण तरीही जॉन हार्वे केलॉग यांनी आपलं स्वयंशिक्षण सुरूच ठेवलं.

जॉन हार्वे केलॉग (John Harvey Kellogg) यांना शिक्षक व्हायचं होतं. वयाच्या सोळाव्या वर्षी ते मिशिगनमधल्या हेस्टींज इथल्या जिल्ह्यात असलेल्या शाळेत शिकवू लागले. ते वीस वर्षांचे असताना मिशिगन स्टेट नॉर्मल स्कुलने त्यांना शिक्षक ट्रेनिंग कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ऑफर दिली. जॉन हार्वे केलॉग यांनी ती ऑफर स्वीकारली आणि त्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतलं.

१८७६ साली जॉन हार्वे केलॉग (John Harvey Kellogg) हे वेस्टर्न हेल्थ रिफॉर्म इन्स्टिट्यूट येथे संचालक म्हणून काम करायला लागले. ते काम त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सुरू ठेवलं. कालांतराने १४ डिसेंबर १९४३ साली त्यांचं निधन झालं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.