America : व्हाईट हाऊसचे गूढ उकलले; ‘हे’ आहेत बंकरकडे नेणारे भुयारी मार्ग

118
मध्ययुगीन काळामध्ये भारतापासून ते युरोपीय देशांपर्यंत अनेक राजे महाराजांनी आपल्या राज महालांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुप्त भुयारी मार्ग बांधायला सुरुवात केली. हे गुप्त भुयारी मार्ग राज्यावर संकट आले असता आपत्कालीन परिस्थितीत राजांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी उपयोगी पडत असत. या भुयारी मार्गांनी एका देशातून दुसऱ्या देशातही जाता येत असे इतके ते मोठे असत. काही गुप्त भुयारी मार्ग तर इतके मोठे असू शकतात की संकटकाळात राजा आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षितपणे जगाच्या दुसऱ्या टोकालाही नेऊन सोडू शकतात.
अमीरिकेतील व्हाईट हाऊसमध्येही असे अनेक गुप्त भुयारी मार्ग आहेत. हे मार्ग अमेरिकेचे प्रेसिडेंट त्यांचे कुटुंब आणि व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या स्टाफला संकटकाळामध्ये कोणालाही त्यांचा सुगावा लागू न देता त्यांच्या बंकरपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवू शकतात. हे गुप्त भुयारी मार्ग वेगवेगळ्या काळात तयार करण्यात आलेले आहेत.
1930 साली अमेरिकेतील पत्रकारांमध्ये व्हाईट हाऊसच्या गुप्त भुयारी मार्गांविषयी जोमाने चर्चा होऊ लागली होती. पण त्यावेळेस असा कुठलाही गुप्त भुयारी मार्ग अस्तित्वात नव्हता. पण 1941 सालच्या पर्ल हार्बर अॅटॅकनंतर अशा प्रकारचा गुप्त भुयारी मार्ग तयार करण्याची गरज तीव्रतेने भासू लागली आणि त्यानुसार कामही सुरू करण्यात आले. 1950 साली व्हाईट हाऊसच्या भिंतींना तडे पडायला लागले. तेव्हा व्हाईट हाऊसची दुरुस्ती करण्याची गरज भासू लागली आणि त्यानुसार कामही सुरू करण्यात आले.
अमेरिकेचे त्या काळचे प्रेसिडेंट हॅरी एस. ट्रूमेन यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसच्या दुरुस्तीसोबतच तिथे गुप्त भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या काळात प्रेसिडेंट तीन वर्षांपर्यंत जवळपासच्या ब्लेअर हाऊसमध्ये शिफ्ट झाले होते. त्यावेळेस व्हाईट हाऊसमध्ये एक टनलही तयार करण्यात आला होता. हा टनल व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंग आणि वेस्ट विंगला जोडणारा होता. तसेच या टनलद्वारे बंकरपर्यंत सुरक्षितपणे पोहोचता येते असे.
1987 साली अमेरिकेचे चाळीसावे प्रेसिडेंट रोनाल्ड रिगन यांच्या कार्यकाळामध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांना लक्षात घेता. दुसरा भुयारी मार्ग तयार करण्यात आला. व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार या गुप्त मार्गाने ओव्हल ऑफिस जवळ असलेल्या गुप्त शिडीपर्यंत पोहोचता येते. या शिडीजवळ असलेले एक बटन दाबले असता एक गुप्त दरवाजा उघडतो. या दरवाज्यातून जाणारा रस्ता कुठे जातो हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही.
या व्यतिरिक्त व्हाईट हाऊसमध्ये एक तिसरा भुयारी मार्गही आहे. हा मार्ग ईस्ट विंगच्या बेसमेंटपासून ते ट्रेजरी बिल्डिंगपर्यंत जातो. हा मार्ग अशा प्रकारे तयार केला गेला आहे की, हवाई हल्ल्यांचा या मार्गावर कोणताही परिणाम होत नाही. आणखी एक भुयारी मार्ग आहे जो व्हाईट हाऊसला ओल्ड एक्झिक्युटिव्ह बिल्डिंगशी जोडतो. हा मार्ग अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या टनलशी जोडला आहे. या टनलद्वारे वेगवेगळ्या अज्ञात आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचता येते. पण या गोष्टीचे लिखित प्रमाण कुठेही सापडत नाही.
असोसिएट प्रेसच्या म्हणण्यानुसार व्हाईट हाऊसचे निर्माणकार्य अतिशय गुप्त राखले गेले आहे. व्हाईट हाऊसच्या बंकरच्या भिंती जाड काँक्रीटच्या विटांनी तयार केल्या गेल्या आहेत. या भिंती इतक्या मजबूत आहेत की, न्यूक्लियर बॉम्बचाही या भिंतींवर कोणताही परिणाम होऊ शकत नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.