…म्हणून एअर इंडियाकडून हाँगकाँगची उड्डाणं २३ एप्रिलपर्यंत रद्द!

99

देशात कोरोनाचा कहर नियंत्रणात असला तरी जगात अद्याप कोरोनाचं थैमान सुरू असल्याचे दिसतेय. अशातच कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा फटका पुन्हा एकदा विमान सेवेवर बसल्याचे दिसतेय. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी विमान सेवा 23 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाईटमध्ये तीन प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर हाँगकाँगने फ्लाईटवर बंदी घातली.

एअर इंडियाने केले ट्विट

दोन वर्षांच्या प्रदीर्घ बंदीनंतर 27 मार्च रोजी भारताकडून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांकडून नव्याने जाहीर कोविड-19 निर्बंधांमुळे आणि मर्यादित मागणीमुळे एअर इंडियाने हाँगकाँगला जाणारी विमानसेवा 24 एप्रिलपर्यंत रद्द केली असल्याचे एअर इंडियाने ट्वीट करत सांगितले आहे.

(हेही वाचा – मलिकांना दणका! कोठडीतील मुक्काम आणखी वाढला)

म्हणून घेतला उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय

एका रिपोर्टनुसार, 16 एप्रिल रोजी एअर इंडियाच्या AI316 दिल्ली-कोलकाता-हाँगकाँग फ्लाइटमध्ये हजर असलेल्या तीन प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, प्रवासाच्या 48 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरच भारतीय प्रवासी हाँगकाँगमध्ये जाऊ शकतील. यासह सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मधील विमानतळ परिसरात आल्यावर कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.