Air Force Day : वायुसेनेत आत्मनिर्भरता आणण्यासोबतच आधुनिकीकरणावर देणार भर – एअर व्हाईस मार्शल रजत मोहन

124
Air Force Day : वायुसेनेत आत्मनिर्भरता आणण्यासोबतच आधुनिकीकरणावर देणार भर - एअर व्हाईस मार्शल रजत मोहन
Air Force Day : वायुसेनेत आत्मनिर्भरता आणण्यासोबतच आधुनिकीकरणावर देणार भर - एअर व्हाईस मार्शल रजत मोहन

कोणत्याही संकटाच्या सर्वप्रथम प्रतिसाद देणारे हवाई दल केवळ आपल्या आकाशाचे संरक्षण करत नाही, तर नैसर्गिक संकटाच्या वेळीही अत्यंत प्रभावीपणे प्रतिसाद देते. वायुसेनेत मोठ्या प्रमाणात आत्मनिर्भरता आणण्यासोबतच या दलाचे आधुनिकीकरण करण्यावर देखील भर देण्यावर आणि अग्निवीर वायूचा हवाई दलात समावेश याला प्राधान्य दिले जात असल्याचे प्रतिपादन एअर व्हाईस मार्शल रजत मोहन यांनी केले. (Air Force Day )

वायुसेना दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील युनायटेस सर्विस क्लब इथे, मेरीटाईम एअर ऑपरेशन्स च्या मुख्यालयात, विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (७ ऑक्टोबर) ला झालेल्या या कार्यक्रमात हवाई दलाच्या पूर्व आणि आजच्याही हवाई योद्ध्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल, रमेश बैस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबईतील या मुख्यालयाचे प्रमुख, एअर व्हाईस मार्शल रजत मोहन, व्हीएम, हे ही यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा : Bharat Gogwale : राजकारण आणि खेळात काय घडेल हे सांगता येत नाही, भरत गोगवले यांची स्पष्टोक्ती 

यावेळी पुढे बोलताना रजत मोहन यांनी सांगितले की, हवाई दलातील योद्धे त्यांचे प्राथमिक कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या कुटुंबांची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी सर्व हितसंबधियांचे त्यांनी आभार मानले. सर्व हवाई योद्धे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने, त्यांनी हवाई दलातील विंग कमांडर जगमोहन नाथ, महावीर चक्र यांना आदरांजली वाहिली. त्यांचे या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई निधन झाले होते. भारतीय हवाई दलाच्या ज्येष्ठ अधिकारी आणि सैनिकांनी देशासाठी केलेल्या सेवेची दखल घेत, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.