मुंबईपाठोपाठ ‘या’ शहरातील हवेची गुणवत्ता खालावली

121

सोमवारी मुंबई किना-यावर पोहोचलेल्या पाकिस्तान आणि इराणच्या वाळवंटातील वाळूच्या कणांचा प्रभाव पुण्यावरही जाणवला. पुण्यात चक्क एका दिवसात हवेच्या दर्ज्याने धोकादायक पातळी गाठली. सोमवरी संपूर्ण पुण्याच्या हवेची गुणवत्ता ३७४ वर पोहोचली. उद्या मंगळवारीही पुण्याच्या हवेची गुणवत्ता ३३२वर राहील, असा इशारा सफर या प्रणालीने दिला आहे. सफर ही वेधशाळा आणि पुण्यातील आयआयटीएम या केंद्रीय पृथ्वी व विज्ञान संस्थेच्या समन्वयातून पुणे आणि मुंबई या राज्यातील दोन प्रमुख शहरांतील हवेच्या दर्जाबाबत पूर्वकल्पना तसेच सद्यस्थितीतील हवेच्या दर्जाबाबत माहिती देते. हवेचा दर्जा बिघडल्यास आवश्यक काळजीच्या सूचनाही सफरच्यावतीने केल्या जातात. मुंबईखालोखाल आज पुण्यात हवेचा दर्जा बिघडल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सफरच्यावतीने करण्यात आले आहे.

(हेही वाचा – मुंबईकरांनो… कडाक्याच्या थंडीत बाहेर पडताय? अशी घ्या काळजी)

पुण्यातील धोकादायक ठिकाणे आणि सूक्ष्म धूलिकणांची मात्रा

  • भोसरी – ३०९
  • आळंदी – ३०८
  • निगडी – ३१२
  • भूमकर चौक – ३२९
  • लोहगाव – ३०९
  • शिवाजीनगर – ३१२
  • कोथरुड – ३२२
  • पाषाण – २९३
  • हडपसर – ३६१
  • कात्रज – ३१६

काय काळजी घ्याल

० पहाटे घराबाहेर जाणे शक्यतो टाळा. प्रभातफेरी टाळा
० दमेकरी रुग्ण घराबाहेर जाण्याच्या विचारात असाल तर अस्थमाची औषधे सोबत घ्या
० अतिघाईचे काम शक्यतो करु नका
० सर्दी, खोकल्याचा त्रास उद्भवल्यास डॉक्टरांना भेट द्या
० घरी एसी शक्यतो बंद ठेवा. खिडक्या बंद ठेवा.
० या दिवसांत लाकूड किंवा मेणबत्त्या जाळू टाका
० घरात ओल्या कपड्यांनी जमीन पुसूत राहा जेणेकरुन धूळ साठणार नाही
० घराबाहेर एन-९५ मास्क घराबाहेर लावा किंवा दोन मास्क तोंडाला लावा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.