… म्हणून ‘या’ भागातील PMPML सेवा पुन्हा सुरू करण्याची होतेय मागणी

80

पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील काही मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात पीएमपी (PMPML) तोट्यात चालत असल्याने ग्रामीण मार्गावरील पीएमपी सेवा बंद करण्याचे मुख्य कारण ठरले. दरम्यान, व्हेल्हे तालुक्यात विंझर ते कात्रजदरम्यान पीएमपीएलची बससेवा सुरू करण्यात आली होती; परंतु २६ नोव्हेंबरपासून ही बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, कामगार व प्रवासी यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पीएमपीएल सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांसह विद्यार्थी व कामगारांनी केली आहे.

नुकतेच या मागणीचे निवेदन प्रवाशांनी पीएमपीएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांना दिले आहे. एसटीची (MSRTC) सेवा बंद असल्याने ग्रामीण भागात मागील वर्षी पुणे महानगरपालिकेने पीएमआरडीच्या हद्दीमध्ये पीएमपीएलची बससेवा सुरू करण्यात आली होती. यामध्ये विंझर ते कात्रज अशी बससेवा सुरू करण्यात आली होती. या बससेवेचा फायदा येथील विद्यार्थी, कामगार, महिलावर्ग कर्मचारी आदींना होत होता. बससेवा सुरू झाल्याने पुणे शहराशी वेल्हे तालुका जोडला गेल्याने नागरिकांना याचा फायदा झाला होता. इतकेच नाही तर अनेक बेरोजगार युवक बस सुरू झाल्याने शिवापूर वेळू, वरवे, शिरवळ, पुणे, कात्रज आदी परिसरात रोजगारासाठी दररोज जाऊ लागले होते.

(हेही वाचा – Pension Scheme: विवाहित जोडप्याला मोदी सरकार दर महिन्याला देणार १८,५०० रुपये! पण ‘ही’ आहे अट)

दरम्यान, व्हेल्हे तालुक्यातील शासकीय कर्मचारी यांनादेखील ही सेवा फायदेशीर ठरत होती. सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे सर्व कर्मचारी वेळेत उपस्थित राहत होते. कामगार, विद्यार्थी, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक सर्व प्रवासी बससेवेमुळे आनंदी होते; परंतु २६ नोव्हेंबरपासून बससेवा बंद झाल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राणी भोसले, रायबा भोसले यांनी पीएमपीएल प्रशासनाची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याबाबत विनंती केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.