British Anchor On Chandrayaan 3 : बीबीसीनंतर आता ब्रिटनच्या वृत्तनिवेदकाकडून ‘चंद्रयान ३’ची खिल्ली

ब्रिटनने 2016 ते 2021 मध्ये मदत म्हणून दिलेले 2.3 बिलियन पाउंड्स (24 हजार कोटी) परत करण्याची मागणी

330
British Anchor On Chandrayaan 3 : बीबीसीनंतर आता ब्रिटनच्या वृत्तनिवेदकाकडून 'चंद्रयान ३'ची खिल्ली
British Anchor On Chandrayaan 3 : बीबीसीनंतर आता ब्रिटनच्या वृत्तनिवेदकाकडून 'चंद्रयान ३'ची खिल्ली

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केले आहे, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर मी भारताकडे एक मागणी करतो की, त्यांनी आम्ही 2016 ते 2021 मध्ये मदत म्हणून दिलेले 2.3 बिलियन पाउंड्स (24 हजार कोटी) परत करावेत, अशी मुक्ताफळे ब्रिटनचे वृत्तनिवेदक पॅट्रिक क्रिस्टिस यांनी उधळली आहेत. असे या टिव्ही अँकरचे नाव आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून ०४ मिनिटांनी चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला गवसणी घालणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या या यशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र, युनायटेड किंगडमच्या वृत्तनिवेदकाने असे वक्तव्य करून चंद्रयानची खिल्लीच उडवली आहे. बीबीसीच्या पत्रकाराचा ‘अवकाशावर नाही, तर गरिबांवर लक्ष द्या’, असे सांगणारा विडिओ प्रसारित झाला होता.

(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : लहान मुलांसाठी पालिकेकडून उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू)

एका कार्यक्रमात चंद्रयानबाबत वृत्तनिवेदक पॅट्रिक क्रिस्टिस म्हणतात, आता भारताने ब्रिटनला पैसे परत करावेत. पुढच्या वर्षी आम्ही भारताला 57 मिलियन पाउंड्स (595 कोटी रुपये) देणार आहोत. आपल्या देशातील लोकांनी हे थांबवायला हवे. आपल्याला एक नियम बनवायला हवे. ज्या देशांच्या स्वतःच्या अंतराळ मोहिमा आहेत, त्यांना ब्रिटनने पैसे देणे थांबवले पाहिजे.

जर तुम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत यान पाठवू शकता तर तुम्ही आमच्याकडून पैसे नाही मागितले पाहिजेत. एका रिपोर्टनुसार भारतात 229 मिलियन (22.9 कोटी रुपये) लोक गरीब आहेत. खरे तर भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जवळपास 3.75 ट्रिलियन डॉलर्स (250 लाख कोटी रुपये) आहेत. आपण भारताच्या गरिबाची मदत का करत आहोत. जेव्हा त्यांच्या सरकारलाच त्यांची काही चिंता नाही, असे पॅट्रिक क्रिस्टिस यांनी म्हटले आहे.

पॅट्रिक यांचे ट्विट

पॅट्रिक यांनी स्वतःच हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर भारतियांनी संताप व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने खास शैलीत त्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘ब्रिटनने आमचे 44.997 ट्रिलियन परत करावेत. अनुदानाविषयी आठवण करून देण्यास धन्यवाद. आता आमच्याकडून लुटलेले 45 ट्रिलियन डॉलर परत करा. ब्रिटटने आम्हाला 2.5 बिलियन दिले आहेत. ते कापून घ्या आणि उरलेले 45 लाख कोटी आम्हाला परत करा’, असे एका ट्विटर वापरकर्त्याने सुनावले आहे.

काही वापरकर्त्यांनी पेट्रिक यांना कोहिनूर हिरा परत करण्यास सांगितले आहे. फक्त भारतीयच नाहीत, तर जगभरातील लोकांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.