Mumbai Municipal Corporation : लहान मुलांसाठी पालिकेकडून उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू

केंद्रात लहान मुलांना मोफत उपचार उपलब्ध करण्यात आले आहे.

171
Mumbai Municipal Corporation : लहान मुलांसाठी पालिकेकडून उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू
Mumbai Municipal Corporation : लहान मुलांसाठी पालिकेकडून उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू

लहान मुलांमधील शारीरिक आणि मानसिक व्यंग यावर उपचार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नागपाडा येथे उपचार व पुनर्वसन केंद्र (अर्ली इंटरव्हेन्शन केंद्र) सुरू केले आहे. केंद्रात लहान मुलांना मोफत उपचार उपलब्ध करण्यात आले आहे. जन्मतः व्यंग घेऊन येणाऱ्या मुलांना शारीरिक आणि मानसिक केंद्रात योग्य उपचार मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे.

तब्बल पाच मजली इमारतीचे कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान बांधकाम सुरू करण्यात आले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तातडीने रुग्णसेवा पालिकेने उपलब्ध करून दिली. केंद्राचे अद्यापही अधिकृत उद्घाटन झाले नसले तरीही रुग्णसेवा बाधित होऊ नये म्हणून तातडीने केंद्र कार्यान्वित करण्यात आले. १२ जुलैपासून हे केंद्र सुरू झाले. या केंद्रात लहान मुलांसाठी ऑर्थोपेडिक, फिजिओ, डोळे, दंत, कान-नाक-घसा, लहान मुलांमधील शस्त्रक्रिया, ऑक्कुपेशनल थेरपी या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. लहान मुलांसाठी समुपदेशन सेवा ही डॉक्टरांकडून दिली जात आहे.

अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना येथे मोफत उपचार दिले जातात. आतापर्यंत या केंद्रात ३०० हून अधिक विशेष मुलांनी उपचार घेतले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक गरज फिजिओथेरपीची दिसून येत आहे. ज्या मुलांना दोन वर्ष उलटूनही बोलता-चालता येत नाही, अशी बरीच मुले फिजिओथेरपीसाठी येत असल्याचे डॉक्टर सांगतात.

(हेही वाचा – TB hospital : शिवडीतील क्षयरोग रुग्णालय बनणार फायर प्रुफ)

उपचार व पुनर्वसन केंद्रात उपलब्ध सोयी –
  • श्रवण शास्त्र व वाचा, भाषा विकृती उपचार शाळा.
  • फिजिओथेरपी.
  • बालरोग चिकित्सा.
  • मनोविकृती चिकित्सा.
  • व्यवसाय उपचार स्कूल व सेंटर.
  • अस्थिव्यंग चिकित्सा.
  • कान-नाक-घसा.
  • नेत्रचिकित्सा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.