अभिनेत्री आणि नृत्यांगना Padmini Ramachandran

Padmini Ramachandran : पद्मिनी रंगनाथन यांचा जन्म १२ जून १९३२ साली त्रिवेंद्रम म्हणजेच तिरुवनंतपुरम येथे झाला. त्या काळी त्या राज्याचं नाव त्रावणकोर असं होतं.

148
अभिनेत्री आणि नृत्यांगना Padmini Ramachandran
अभिनेत्री आणि नृत्यांगना Padmini Ramachandran

पद्मिनी रामचंद्रन (Padmini Ramachandran) या एक भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि रशियन भाषेतल्या एकूण अडीचशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच पद्मिनी रामचंद्रन (Padmini Ramachandran) या भारतीय शास्त्रीय नृत्य भरतनाट्यमच्या उत्कृष्ट नृत्यांगना होत्या. पद्मिनी रंगनाथन यांची मोठी बहीण ललिता आणि लहान बहीण रागिणी यासुद्धा अभिनेत्री होत्या. त्या तिघींना संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये ‘त्रावणकोर सिस्टर्स’ म्हणून ओळखलं जायचं. (Padmini Ramachandran)

(हेही वाचा- Porsche Accident Pune : किडनी तस्करीतही अडकलेला Dr. Ajay Taware)

पद्मिनी रंगनाथन (Padmini Ramachandran) यांचा जन्म १२ जून १९३२ साली त्रिवेंद्रम म्हणजेच तिरुवनंतपुरम येथे झाला. त्या काळी त्या राज्याचं नाव त्रावणकोर असं होतं. आता त्या राज्याला केरळ म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या वडिलांचं नाव थक्कपन पिल्लई आणि आईचं नाव सरस्वती अम्मा असं होतं. (Padmini Ramachandran)

१९६१ साली पद्मिनी यांनी यु. एस. मध्ये राहणाऱ्या रंगनाथन नावाच्या डॉक्टरशी विवाह केला. लग्नानंतर त्या पद्मिनी रंगनाथन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी आपलं पूर्ण लक्ष आपल्या कुटुंबावर केंद्रित केलं. १९६३ साली त्यांना एक मुलगा झाला. हा मुलगा आता न्यू जर्सी इथल्या हिल्सडेल येथे राहतो आणि वॉर्नर ब्रदर्ससाठी काम करतो. (Padmini Ramachandran)

(हेही वाचा- लेफ्टनंट जनरल Upendra Dwivedi होणार नवीन लष्करप्रमुख; 30 जूनला पदभार स्वीकारणार)

पद्मिनी रंगनाथन यांनी १९७७ साली, आपल्या लग्नाच्या सोळा वर्षांनंतर न्यू जर्सी येथे इंडियन क्लासिकल डान्स स्कुल सुरू केलं. त्याचं नाव ‘पद्मिनी स्कुल ऑफ फाईन आर्ट्स’ असं होतं. आजच्या घडीला हे डान्स स्कुल अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या इंडियन क्लासिकल डान्स इन्स्टिट्यूट्सपैकी एक आहे. (Padmini Ramachandran)

त्या काळी पद्मिनी आणि तत्कालीन अभिनेत्री वैजयंतिमाला या दोघींमध्ये मोठ्या प्रमाणात तुलना केली जायची. (Padmini Ramachandran)

(हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये दहशतवादी हल्ले सुरुच; Doda मध्ये लष्करी तळावर केला गोळीबार)

२३ सप्टेंबर २००६ साली तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्याशी भेटीदरम्यान त्यांना प्राणघातक ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात करण्यात आलं होतं. २४ सप्टेंबर २००६ साली चेन्नई इथल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये पद्मिनी रंगनाथन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय ७६ वर्ष होतं. (Padmini Ramachandran)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.