लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीपचा चक्काचूर! ६ जण गंभीर

83

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे यात ज्या जीपचा चक्काचूर झाला, ती जीप लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. या अपघातामध्ये जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

लातूर – जहीराबाद महामार्गावर केळगाव ते बुजरुकवाडी पाटीच्या दरम्यान निटूरकडे जाण्याच्या दिशेने टेम्पो क्र. एमएच १४ एएच ६२२३ व व जीप क्र. एमएच १४ सीसी ८३३८ चा वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. टेम्पो हा सोयाबीनची गुळी घेऊन केळगावच्या दिशेने जात होता. तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघाली होती. यात अपघातात जीपचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात जीपमधील पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ रूग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावून घेतले. सर्व जखमीला निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

(हेही वाचा साहित्य संमेलन आणि मराठी भाषा शुद्धीकार वीर सावरकरांचा सन्मान)

दिशादर्शक फलक नसल्याने अपघात 

मागील काही दिवसांपासून लातूर ते जहीराबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक व अनेक गावावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित महामार्ग प्रशासनाने लवकरात गाव तिथे रस्ता दुभाजक करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.