मार्सेलिसमधील दूतावासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या म्युरलची स्थापना करावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचे पत्र

122
मार्सेलिसमधील दूतावासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या म्युरलची स्थापना करावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचे पत्र

मार्सेलिसमधील नवीन दूतावासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे म्युरल स्थापन करावे, अशी मागणी वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

मार्सेलिसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ जुलै १९१० ला मोरिया या नौकेतून मारलेल्या ऐतिहासिक उडीचे स्मारक तिथे व्हावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रयत्न करीत आहे. मार्सेलिसमध्ये भारताचा नवीन दूतावास सुरु होत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली आहे. या दुतावासातदेखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ऐतिहासिक उडीचे म्युरल निर्माण व्हावे, अशी मागणी रणजित सावरकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.

(हेही वाचा – Uddhav – Ajit Meeting : उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी घेतली अजित पवारांची भेट)

पत्रात काय?

– पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात रणजित सावरकर म्हणतात, मार्सेलिसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक बांधावे, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी भारत सरकार आणि फ्रान्स सरकारकडे अनेक वर्षांपासून करत आहेत. या स्मारकाचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने दर्शविली होती. १९९८ मध्ये या उपक्रमाला मार्सेलिसच्या महापौरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महापौरांनी या स्मारकासाठी आपली संमती दिली. पण, हे काम भारत सरकारद्वारे होणे गरजेचे आहे, असे कळवण्यात आले. त्याकाळात भारत सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने हे काम अपूर्ण राहिले.

– यासंदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी त्या दिशेने प्रयत्नही केले, पण या दरम्यान सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यासाठी प्रयत्न करत आहेत.

– या स्मारकाचे काम तुमचे सरकार पूर्ण करेल याची आम्हाला खात्री आहे. परंतु तुम्ही मार्सेलीस येथे नवीन भारतीय दूतावास स्थापन केल्याची घोषणा केल्यानंतर आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की या दूतावासात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक उडीवर आधारित म्युरल असावे.

– सावरकरांच्या ऐतिहासिक आणि कालातीत कार्याची ओळख येणाऱ्या पिढ्यांना करून देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. या कार्यासाठी योग्य मार्गदर्शक सूचना देऊन आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक प्रणेत्याला आदरांजली वाहाल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. वंदे मातरम

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.