सायनमध्ये आयकर धाडीत ७०-८० कोटींचा घोटाळा उघड

117

आयकर विभागाने प्रथमच झोपड्पट्टीत धाड टाकली आहे. त्यामुळे या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील झोपडपट्टीत राहणारे जनतावादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष कटके हे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. झोपडपट्टीतून चालणाऱ्या या पक्षाला जवळपास ७०-८० कोटी देणगी मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बुधवारी झोपडपट्टीत राहणाऱ्या संतोष कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला.

संतोष कटके गेल्या २० वर्षापासून राहत आहे 

२०१४ मध्ये संतोष कटके यांनी पक्षाची स्थापना केली होती. २०१४ ते २०२२ या कालावधीत संतोष कटके यांच्या पक्षाला ७०-८० कोटी देणगी मिळाली आहे. आयकर विभागाला संशय होता की, संतोष कटके हा जनतवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होता. बुधवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संतोष कटकेच्या घरासोबत चुनाभट्टी येथील कार्यालयावरही छापा टाकला. यावेळी संतोषसह त्याच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सकाळी ६ वाजताच्या सुमारास आयकर विभागाची टीम संतोषच्या सायन येथील घरी पोहचली होती. सायन येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये संतोष कटके गेल्या २० वर्षापासून राहत आहे. संतोषच्या चौकशीत अधिकाऱ्यांनी पक्षाशी संबंधित आयकराची कागदपत्रे, देणगीशी निगडीत व्यवहार, बिले मागितली. आतापर्यंत पक्षाने किती निवडणुका लढल्या. त्यावर किती खर्च झाला आणि खर्च केल्यानंतर किती पैसा उरला आहे. उरलेले पैसे कुठे आहेत असे विविध प्रश्न चौकशीत विचारण्यात आले.

(हेही वाचा मध्य प्रदेशात लव्ह जिहाद घडवण्याचा प्रयत्न, मुलीने विरोध करताच ऍसिड हल्ल्याची धमकी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.